8 May 2024 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

अजित पवारांना मोठा दिलासा | राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीन चीट

Mumbai Police, Economic Offences Wing, files a closure report, Maharashtra Cooperative Bank

मुंबई, ८ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चीट मिळली आहे. मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयात आज क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर ईडीने गुन्हा दाखल केला होता. नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. परंतु, त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बँकेच्या ३४ शाखांमधील कथित घोटाळ्यासंबंधित वर्षभर केलेल्या तपासणीत कोणताही पुरावा किंवा अनियमितता आढळली नसल्याचा दावा या अहवालात केला आहे. पोलिसांनी ईडीलाही क्लोजर कॉपी पाठविली. मात्र, ईडीने न्यायालयात क्लोजर अहवालाला विरोध दर्शविला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

आम्ही हजारो कागदपत्रे, लेखापरीक्षण अहवाल आणि 100 हून अधिक व्यक्तींची चौकशी केली. हेदेखील समोर आले की, पवार कधीच कोणत्याही बैठकीला उपस्थित राहिले नव्हते आणि निविदा प्रक्रियेत त्यांनी कोणतीही भूमिका निभावली आहे हे दर्शविण्यासाठी कोणताही पुरावा नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, २०१५ मध्ये कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी ईओडब्ल्यूकडे तक्रार दाखल केली होती आणि एफआयआर नोंदवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

News English Summary: Deputy Chief Minister Ajit Pawar has received great relief over the alleged Maharashtra State Co-operative Bank scam. In this case, 69 people including Ajit Pawar have got clean chit. A closure report was filed by the Mumbai Police in the Sessions Court today. The ED had filed a case against Deputy Chief Minister Ajit Pawar and some leaders of the ruling party in connection with the Maharashtra State Co-operative Bank scam worth Rs 25,000 crore.

News English Title: Mumbai Police Economic Offences Wing files a closure report in Maharashtra Cooperative Bank alleged scam Ajit Pawar Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x