1 December 2022 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Surya Rashi Parivartan | या 3 राशीच्या लोकांनी 16 डिसेंबरपासूनचा काळ सांभाळून पार करावा, कोणत्या राशी पहा RBI e-Rupee | आरबीआय ई-रुपयासाठी इंटरनेट लागणार? सर्वसामान्यांना कसा फायदा होणार समजून घ्या EPF Pension Limit | खासगी नोकरदारांना आता 25000 रुपये पेन्शन मिळणार, तुमचे पैसे 333 टक्क्यांनी असे वाढणार पहा ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या
x

..त्या प्रश्नाच्या भीतीमुळेच गुप्तेश्वर पांडेंना तिकीट दिलं नसावं | राष्ट्रवादीचा भाजपाला टोला

Bihar Assembly Election 2020, home minister Anil Deshmukh, Gupteshwar Pandey, Devendra Fadnavis

मुंबई, ८ ऑक्टोबर : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वादास सुरुवात झाल्यापासून बिहार पोलिसांचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचे नाव बरेच चर्चेत होते. दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच गुप्तेश्वर पांडेंनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत थेट राजकारणात उडी घेतली होती. पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर बक्सर जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील. अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र जेडीयूने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काल जाहीर केलेल्या ११५ उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचं नावच नसल्याने आता पांडे यांचं काय होणार याची चर्चा रंगली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आक्रमक असलेले गुप्तेश्वर पांडे पोलीस सेवेतून अचानक स्वेच्छानिवृ्त्ती घेऊन राजकारणात आले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत दणक्यात जेडीयूमध्ये प्रवेश केल्याने त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार हे नक्की मानले जात होते. मात्र आता ही शक्यता मावळताना दिसत आहे. कारण जेडीयूने पांडे यांना तिकीट दिलेले नाही. दुसरीकडे पांडे इच्छुक असलेल्या मतदारसंघातून भाजपानं आपला उमेदवार जाहीर केला आहे. पांडे यांना उमेदवारांच्या यादीतून वगळल्यानंतर राष्ट्रवादीनं चिमटे काढत भाजपावर निशाणा साधला आहे.

गुप्तेश्वर पांडे यांना उमेदवारी यादीतून वगळण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपाला चिमटा काढला आहे. ‘एएनआय’शी बोलताना अनिल देशमुख म्हणाले,”गुप्तेश्वर पांडे (बिहारचे माजी पोलीस महासंचालक) यांना तिकीट देणं हा पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही असा प्रश्न विचारला होता की, भाजपाचे नेते त्यांचा प्रचार करतील का? कदाचित या प्रश्नाच्या भीतीमुळेच त्यांना तिकीट दिलं गेलं नसावं,” असा टोला देशमुख यांनी लगावला.

 

News English Summary: Giving an election ticket to Gupteshwar Pandey (former Bihar DGP) is a matter of the party. We had asked whether BJP leaders will campaign for him. It was maybe due to fear of this question that he was not given a ticket said Maharashtra Home Minister Anil Deshmukh.

News English Title: Bihar Assembly Election 2020 home minister Anil Deshmukh on Gupteshwar Pandey Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x