India will Launch Industry Led Policies in Space Sector | ISRO मध्येही खासगी भागीदारी वाढणार
नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर | एका बाजूला भारत सरकारच्या मालकीच्या कंपन्यांची विक्री आणि खाजगीकरण होतं असताना मोदी सरकारचा मोर्चा आता स्पेस सेक्टरकडे वळणार आहे आणि त्यात केंद्रस्थानी राहणार आहे (India will Launch Industry Led Policies in Space Sector) भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO.
India will Launch Industry Led Policies in Space Sector. The government is said to be considering expanding its private partnership with ISRO, India’s space research institute. Following the same theme, ISRO chief Dr. K. Sivan shared some information :
भारताच्या अंतराळ संशोधन संस्था ISRO मध्ये खासगी भागीदारी वाढवण्यावर सरकारचा विचार सुरू असल्याचे म्हटलं जातंय. याच विषयाला अनुसरून काही धोरणांमध्ये बदल करत उद्योग आधारित योजना आणणार असल्याची माहिती इस्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांनी दिली.
भारतीय अंतराळ क्षेत्रात खासगी भागीदारी वाढवण्यासाठी वर्तमान धोरणांमध्ये महत्त्वाचा बदल केला जात आहे. तसेच यात दुरुस्ती करून नवीन धोरण, योजना आखल्या जातील. उद्योग आधारित धोरणे तयार करण्यावर भर असून, यावर काम सुरू असल्याची माहिती के. सिवन यांनी दुबई येथील एका कार्यक्रमात बोलताना दिली. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
धोरणातील सुधारणांनंतर खासगी क्षेत्रातील कंपन्यांना अंतराळ क्षेत्रातील अनेक प्रक्रियांमध्ये सहभागी होता येईल. तशी संधी उपलब्ध झाल्याने खासगी क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल, असे के. सिवन यांनी म्हटले आहे. वाणिज्य आणि तंत्रज्ञान सहयोगातून अंतराळ क्षेत्र आणखी मजबूत होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करत जागतिक स्तरावर अंतराळ क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच भारताला एक आर्थिक अंतराळ केंद्र बनवण्यासाठी भारतीय अंतराळ असोसिएशन नामक योजना लॉंच करण्यात आल्याचेही सिवन म्हणाले. अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांना आमंत्रित करण्यासाठी इस्रो तयार असून, स्टार्ट अप कंपन्यांची भागीदारी करण्यावर काम सुरू आहे, असं देखील सिवन यांनी नमूद केले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.
News Title: India will Launch Industry Led Policies in Space Sector information shared by Dr K Sivan.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा