28 April 2024 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस?
x

८ वीच्या पुस्तकात ‘लोकमान्य टिळक हे दहशतवादाचे जनक’ : राजस्थान

राज्यस्थान : राज्यस्थान मध्ये इंग्रजी माध्यमातील इयत्ता ८ वीच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये लोकमान्य टिळकांविषयी अपमानजनक उल्लेख आहे. राजस्थानमधील शिक्षण क्षेत्रातील या चुकीमुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

इयत्ता ८ वीच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये ‘१८ व्या आणि १९ व्या शतकातील राष्ट्रीय चळवळ’ या धड्यात तो अपमानजनक उल्लेख करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात मोलाचा वाटा असणारे बाळ गंगाधर टिळक यांचा उल्लेख ‘दहशतवादाचे जनक’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. अशा मोठ्या चुका होतातच कशा आणि पुस्तकं छापण्यापूर्वी कोणतीही खात्री केली जाते की नाही असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित करत आहेत.

ज्या लोकमान्य टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला त्यांच्या बद्द्ल राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील ८वी इयत्तेच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये ‘दहशतवादाचे जनक’ (फादर ऑफ टेररिझम) असा उल्लेख करण्यात आहे. ब्रिटिशांना विनंती करून स्वातंत्र्य मिळणार नाही असं त्यांना वाटू लागलं. त्यासाठीच लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराज व गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशभरात जनजागृतीचा सुरु केली आणि जनतेमध्ये स्वातंत्र्यांचा संदेश पोहोचविल्याने ब्रिटीशांना लोकमान्य टिळक खुपत होते असा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे.

मथुरा स्थित एका प्रकाशकाने ते पुस्तक छापले आहे. त्याच पुस्तकातील लोकमान्य टिळकांविषयी छापलेल्या ‘दहशतवादाचे जनक’ या उल्लेखाने रान उठण्याची शक्यता आहे. राज्यस्थान मध्ये शिक्षण मंडळ हिंदी भाषेत पाठ्यपुस्तके छापत असल्याने इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना रेफरन्स बुकचाच आधार घ्यावा लागतो आणि नेमकी त्यातच ही मोठी चूक झाली आहे. त्यामुळे अशा थोर व्यक्तीबद्दल आपण मुलांना त्यांच्याबद्दल काय ज्ञान देत आहोत असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

तर दुसरीकडे हे पुस्तक छापणाऱ्या मथुरा स्थित प्रकाशकाने स्वतःची जवाबदारी झटकली असून आम्ही केवळ राजस्थानमधील शिक्षण मंडळाच्या नियमानुसारच पुस्तके छापली आहेत अशी केविलवाणी प्रतिक्रिया ‘हिदुस्तान टाइम्स’ला दिली आहे. यापुढे राजस्थानमधील सरकार काय कारवाई करणार ते पहावं लागेल.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x