2 May 2025 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
x

पोलीस मारहाण प्रकरण | ठाकरे सरकरमधील मंत्री यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांची शिक्षा

MahaVikas Aghadi, Minister Yashomati Thakur, Sentenced Three Months, Beating Police

अमरावती, १५ ऑक्टोबर : महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयाने पोलीस मारहाण प्रकरणात ३ महिन्यांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावला आहे. आठ वर्षे जुन्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आठ वर्षांपूर्वी यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा वाहनचालक आणि दोन कार्यकर्त्यांचाही समावेश होता.

आठ वर्षांपूर्वी २४ मार्च २०१२ रोजी आमरावतीमधील अंबादेवी मंदिराजवळ यशोमती ठाकूर आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणे आणि शासकीय कामकाजात अडथळा आणणे, याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

News English Summary: Women and Child Welfare Minister Yashomati Thakur had beaten up a police officer named Ulhas Raurale near Ambadevi temple. This included his driver and two accompanying workers. An Amravati court has sentenced Thakur to three months imprisonment and a fine of Rs 15,000. Thakur has not yet commented on the verdict.

News English Title: MahaVikas Aghadi Minister Yashomati Thakur Sentenced Three Months For Beating Police Eight Years Ago Case News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या