29 April 2024 3:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार | संजय राऊत यांचं मोठं विधान

MP Sanjay Raut, Shivsena, Dasara Melava

मुंबई, १७ ऑक्टोबर : दसरा मेळावा व्यासपिठावरच होणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच दसरा मेळावा असेल. दसरा मेळाव्याचं महत्व राजकिय आणि सांस्कृतिक देखील आहे. दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत चर्चा होईल. नियम आणि आरोग्याच्या दृष्टीनं योग्य होईल अश्या पद्धतीचं नियोजन केलं जाईल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याच्या जोरदार चर्चा असून या चर्चांना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. कुणी सांगितलं शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल? उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, असं सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहारमधील १२ सभा कशा होणार आहेत याचा अभ्यास करु,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. “दसरा मेळावा शिवसेनेची परंपरा असून त्याचं सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. तसंच बऱ्याच वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. सरकारने आखलेल्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल. सध्या चर्चा सुरु असून एक दोन दिवसात निर्णय होईल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

 

News English Summary: Shiv Sena leader Sanjay Raut has said that the Dussehra festival will be held on the platform itself. This will be the first Dussehra rally as Shiv Sena Chief Minister. The importance of Dussehra festival is also political and cultural. There will be a discussion on how to hold a Dussehra festival. Sanjay Raut has said that the planning will be done in a way that will be right in terms of rules and health.

News English Title: MP Sanjay Raut on Shivsena Dasara Melava News Updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x