12 May 2024 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641
x

केंद्राच्या मदतीत काय चूक | पंतप्रधानांचा मला फोन आला होता | मदत करू म्हणाले होते

Chief Minister Uddhav Thackeray, Devendra Fadnavis

मुंबई, १९ ऑक्टोबर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल, त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार आहे, घोषणा देणारे गेले आम्ही प्रत्यक्षात काम करू असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे. विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.

“राज्यात अतिवृष्टी आली असताना राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली तर बिघडलं कुठं?,” असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित केला आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीसही मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्राकडे मदत मागितली. त्यावर पंचनामे करण्याची वाट न पाहता मदत करावी असे फडणवीस म्हाले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता फडणवीसांना चांगलाच टोला लगावला आहे.

“केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही. ते देशाचं सरकार आहे. विरोधक केवळ पक्षाचा विचार करत असतील. देशाचं सरकार आहे. त्यांनी पक्षपात न करता मदत करणं अवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोन करुन मदतीचं आश्वसन दिलं आहे. त्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे. राजकारणाचा चिखल कुणी एकमेकांवर उडवू नये. केंद्र काय करणार आणि राज्य काय करणार, यापेक्षा राज्याला केंद्राच्या मदतीची गरज असेल तर सर्वांनी एकत्र येऊन ही मागणी मागितली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

 

News English Summary: The central government is not a foreign government. That is the government of the country. Opponents may be thinking only of the party. The country has a government. They must help without prejudice. Prime Minister Narendra Modi has also called and assured help. So they are aware of it. No one should throw the mud of politics on each other. The Chief Minister also said that if the state needs the help of the Center more than what the Center will do and what the state will do, then all should come together and ask for this demand.

News English Title: We will help to Farmers Chief Minister Uddhav Thackeray Target BJP Devendra Fadnavis News updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x