2 May 2024 10:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
x

नाशिक विधानपरिषद निवडणूक, राष्ट्रवादीला मनसेचा पाठिंबा

नाशिक : अत्यंत अटीतटीची होणारी नाशिक विधानपरिषदेची निवडणूक ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारांमध्ये रंगणार असल्याने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच प्रत्येक मत हे महत्वाची भूमिका बजावणार आहे.

हा तिरंगी सामना मुख्यत्वे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार शिवाजी सहाणे, शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांच्यात होणार आहे. आज स्वतः राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक मध्ये दाखल होतील त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांशी चर्चा होईल असं वृत्त आहे.

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींची या निवडणुकीत महत्वाची भूमिका असणार आहे. त्यालाच अनुसरून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस राहुल ढिकले यांनी पत्रकारांना दिली आहे. राष्टवादीच्या गोटात अजून एक मित्र आल्याने राष्ट्रवादीची बाजू अजून बळकट झाली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x