11 August 2020 8:54 PM
अँप डाउनलोड

सामान्य मराठी गुंतवणूकदार फसले? शालिनी कॅब्स'चे मालक व 'ते' राजकीय हितचिंतक कोण?

ठाणे : मुंबई, ठाणे व पुण्यासारख्या शहरात खासगी कॅब सेवा पुरविण्यासाठी शालिनी कॅब्स या टॅक्सी सेवेची सुरुवात २०१५ मध्ये करण्यात आली होती. परिवहन खात्याकडून नवं ट्रान्सपोर्ट लायसन्स काढण्यात आलं होत, त्याचवेळी नेमक्या या हालचाली सुरु झाल्या होत्या असं समजतं. विशेष म्हणजे नेमकी त्याच वेळी ओला – उबेर सारख्या बड्या कंपन्यांविरोधात फास का आवळला जात होता हे गुंतवणूकदारांना आज २-३ वर्षानंतर समजतं आहे. यात अनेक छोट्या गरीब ड्रायव्हर्स आणि मराठी लोकांनी मोठ्या आशेने दहा हजार ते दीड लाख रुपये गुंतविले होते. सर्वात महत्वाचं म्हणजे ‘शालिनी कॅब्स’च्या टीम सोबत शिवसेनेच्या परिवहन मंत्र्यांपासून ते खासदार सुद्धा दिसत आहेत. शिवसेना प्रणित महाराष्ट्र फ्लीट टैक्सी चालक-मालक सेना संघटनेचे खजिनदार दत्तानन पालनकर हे शालिनी कॅब्स’चे संचालक असल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

शालिनी कॅब्स’ची सेवा २०१५ मध्ये सुरु करण्यात आली होती. त्यासंबंधित पार्टी गुंतवणूकदारांना ‘दि ब्लू रूफ’ या ठाण्यातील क्लब मध्ये देण्यात आली होती. परंतु नंतर सगळंच वातावरण बिघडू लागलं आहे. शालिनी कॅब्स’च्या कार्यपद्धतीमुळे सामान्य गुंतवणूकदारांच्या मनात भीती वाढू लागल्याने, त्यांनी गुंतविलेले पैसे परत मिळण्यासाठी रेटा लावायला सुरुवात केली आहे. परंतु अनेकांचे पैसे परत दिले जात नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. कंपनीचे कार्यालय कधी बंद असत तर कधी खुलं आणि त्यामुळे कंपनीला कोणताही वेळकाळ नसल्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत.

गुंतणूकदारांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांविरोधात तक्रार नोंदवली असून सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचे कारण पुढे करत संचालक आणि हितचिंतक जवाबदारी झटकत आहेत. यात राजकारणातील बडे मासे अप्रत्यक्षरीत्या सामील असल्याचे गुणवणूकदार भेदरलेल्या मनाने सांगत आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पुण्यातील हे बहुतेक सामान्य मराठी गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

अनेक गुंतवणूकदार गुंतविलेले पैसे परत मिळविण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात खेटे घालतात, तेव्हा वेळ मारुन काहीतरी तुटपुंजी रक्कम देऊन नंतर या असं सांगून त्यांची हेटाळणी केली जात आहे. अनेकांना केवळ १० हजार मिळण्यासाठी सुद्धा २-३ वर्ष लागली असल्याचं अनेक गुंतणूकदार दबक्या आवाजात सांगत आहेत. शालिनी कॅब्स’च्या संचालकांचे शिवसनेच्या बड्या राजकारण्यांसोबत थेट संबंध असल्याने, सामान्य गुंतवणूकदार भीतीपोटी समोर येण्यास घाबरत आहेत असं समजत. विशेष म्हणजे या स्कीम मधील पहिली कॅब खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना त्यांच्याच निवासस्थानी दाखविण्यात आली होती.

शिवसेना प्रणित महाराष्ट्र फ्लीट टैक्सी चालक-मालक सेनेचे महासचिव संभाजी भोसले आणि याच संघटनेचे खजिनदार व शालिनी कॅब्स’चे संचालक दत्तानन पालनकर यांची शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांसोबत भेट होऊन, त्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची भेट सुद्धा घडवून आणली होती असं समजत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(899)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x