14 December 2024 2:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

माजी मुख्यमंत्री अन त्यांच्या पत्नींचा साधेपणा; आज पद जाताच का होतोय आकांडतांडव?

Amruta Fadnavis

मुंबई: महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री राज्याच्या सर्वोच्च पदावर पुन्हा-पुन्हा विराजमान झाले होते आणि त्यामागे त्यांची मोठी राजकीय मेहनत देखील तितकीच महत्वाची होती. अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख असो की युतीच्या काळातील मनोहर जोशी किंवा नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द आजही तितकीच अबाधित आहे.

पण मुख्यमंत्री पद म्हटलं की अनेक व्हीआयपी लोकांचा सतत वलय पाहायला मिळत आणि यामध्ये स्वतःतील मूळ व्यक्तिमत्व टिकवून ठेवणं ही मोठी कला समजावी लागेल. सामान्य जनमानसापासून ते प्रतिष्ठित लोकांमध्ये उठ बस हा नित्यनियम बनून जातो आणि त्यात महत्वाची कौटुंबिक भूमिका बजावतात त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

अगदी प्रतिभाताई पवार, उज्वलाताई शिंदे, वैशालीताई देशमुख, नीलमताई राणे ते अगदी आजच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे असो यासर्वांचा सार्वजनिक जीवनातील वावर आणि साधेपणा लोकांना आजही भावतो. विशेष म्हणजे तो साधेपणा ओढून ताणून आणलेला नव्हता तर नैसर्गिकच होता, जो आजही तितकाच टिकून आहे. कुटुंबाला मोठं राजकीय वलय असून देखील या माजी मुख्यमंत्र्यांच्या जीवनातील साधेपणा कधीही बदलला नाही. किंबहुना राज्यातील इतर अनेक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कोण हे आजही माहित नाही आणि माहित असलेल्यांना ते समजायचं पंढरपूरच्या पहिल्या पूजेच्या दिवशी झळकणाऱ्या फोटोवरून असंच चित्र.

मोठं मोठे उद्योगपती, सेलिब्रिटी आणि दिग्गज कलाकार अशा लोकांमध्ये वावरताना या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींना कधीही पब्लिसिटीच्या हव्यासाने पछाडल्याचं पाहायला मिळालं नाही. विशेष म्हणजे त्या वलयाचा फायदा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी तेव्हाही केला नाही आणि आजही ते वलय टिकून असलं तरी त्यात त्यांना रस नाही असंच म्हणावं लागेल. आपल्यामुळे मुख्यमंत्री पतीला सार्वजनिक जीवनात अडचण येणार नाही असं कृत्य सोडा, उलट मुख्यमंत्री पद गेल्यानंतर देखील त्यांनी कधी आकांडतांडव केल्याचं पाहायला मिळालं नाही. कारण तोच त्यांच्या परिपक्व व्यक्तिमत्वाचा गुण होता आणि त्यामुळेच आजही त्यांच्याबद्दल सार्वजनिक जीवनात आदर आणि सन्मान टिकून आहे.

त्याउलट सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पद जाताच, भाजपपेक्षा अमृता फडणवीस यांचा रोज सुरु असलेला समाज माध्यमांवरील आकांडतांडव अगदी विरुद्ध आहे आणि त्यांची साधी तुलना देखील राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींसोबत होऊ शकत नाही हे कटू वास्तव आहे. कारण २०१४ मध्ये अचानक लॉटरीमध्ये देवेंद्र फडणवीसांना चालून आलेलं मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर अमृता फडणवीस यांचं बदललेलं व्यक्तिमत्व आणि जीवनशाली म्हणजे सर्वकाही ओढूनताणून आणलेलं आहे हे न समजण्याइतकी सामान्य जनता देखील खुळी नाही.

महाराष्ट्राने नेहमीच कलागुणांची प्रशंसा खुल्यामनाने केली आहे, मात्र ती कला प्रामाणिक असावी एवढीच त्याची अपेक्षा असते. परंतु, अमृता फडणवीसांनी त्यांच्या गायनाची कला अक्षरशः श्रोत्यांवर लादली आहे असंच म्हणावं लागेल. त्यावेळी पतींकडे गृहखातं देखील असल्याने पोलीस कुटुंबासाठी आयोजित कार्यक्रमात अमृता फडणवीस म्हणजे सर्वात मोठ्या सेलेब्रिटी, ज्यांची कला सर्व पोलीस कुटुंबीयांनी शांतपणे सहन करायची हे नित्त्याचे झाले होते. २०१४ पूर्वी स्थानिक कार्यक्रमात देखील संधी मिळाली नसेल, मात्र त्यानंतर थेट अमिताभ बच्चन यांच्यासोबत अल्बम बनू लागले. अमृता फडणवीस कोणत्याही कार्यक्रमात गाऊ लागल्या की संबंधित कार्यक्रमाचे कॅमेरामन स्वतःच खाली बसलेल्या श्रोत्यांच्या चेहऱ्यांवर कॅमेरे फिरवून वास्तव मांडत असतं.

विधानसभा निवडणुकीनंतर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्या सातत्याने प्रहार करत असल्या तरी, निवडणुकीपूर्वी फडणवीसांना लक्ष करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी एका मुलाखतीदरम्यान प्रतिक्रिया देताना त्यांनी त्यांच्या फिल्मी बालिश बुध्दीची झलक दाखवली होती. त्यावेळी मुलाखतीत त्यांना राज ठाकरे यांच्याबद्दल थोडक्यात प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया तर दिली, मात्र त्यावेळी त्यांनी जे हावभाव केले आणि ‘एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट’ अशी प्रतिकिया देत त्या स्वतःच किती मोठी ‘एंटरटेनमेंट’ आहेत याचं राज्याला दर्शन घडवलं.

आज अमृता फडणवीस शेरोशायरीत तत्वज्ञान वाटत असल्या तरी पतिदेवांनी ज्यांच्याविरुद्ध राजकीय रान उठवत गाडीभर पुरावे असल्याचं म्हटलं, त्या अजित पवारांसोबत मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच ‘तुम्ही करून दाखवलं’ असं म्हणत स्वतःच्या तत्वांना तीरांजली दिली होती. कारण एकच होतं आणि ते म्हणजे पतीदेव पुन्हा मुख्यमंत्री झाले होते, जे २ दिवसांनी पायउतार झाले होते. त्यानंतर त्या सतत समाज माध्यमांवर आकांडतांडव करत आहेत आणि त्याच मुख्य कारण म्हणजे शॉर्टकटने मिळालेली प्रसिद्धी शॉर्टकटनेच निघून गेल्याचं त्यांना अजून मान्य नसावं किंवा सहन करता येत नसावं असंच अनेकांना वाटतं आहे.

 

News English Summery: Even Pratibhatai Pawar, Ujwalatai Shinde, VaishaliTai Deshmukh, Nilamtai Rane and even Rashmi Thackeray, the wife of the present Chief Minister, people still feel the simplicity and simplicity of public life. In particular, he was not drawn to simplicity, but natural, which still remains today. Even though the family has a big political ring, the simplicity of the life of this former CM has never changed. In fact, many of the other chief ministers of the state do not know who the wife is today and those who know them understand the picture from the photo which appeared on the first worship day of Pandharpur.

 

Web Title:  Former Chief Ministers of Maharashtra and there social lifestyle.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x