8 May 2024 4:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | ३० ऑक्टोबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making

मेष राश‍ी (Aries Daily Horoscope) : भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. एखाद्या व्यक्तीसोबत मोठा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळा. कुटुंबियांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – निळा.

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Daily Horoscope) : बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस चांगला असेल. दिलेली जबाबदारी वेळेआधी पूर्ण करतील आणि वरिष्ठांची मनं जिंकतील. आजचा शुभ रंग – निळा.

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Daily Horoscope) : आज तुमच्या स्वभावात क्रोध, राग दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक यात्रा, प्रवास करण्याचा लवकरच योग निर्माण होईल. कार्यालयात वातावरण चांगले असेल. आजचा शुभ रंग – हिरवा.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Daily Horoscope) : व्यावसायिक क्षेत्रात आज तुमच्या कार्याचं खूपच कौतुक होईल. कामात चांगले यश प्राप्त होईल. स्थावर संपत्ती वाढण्याचा योग निर्माण होईल. सरकारी कामे पूर्ण होतील. वैचारिक कारणांमुळे एखाद्या निश्चित निर्णयावर तुम्ही पोहोचू शकणार नाहीत. आजचा शुभ रंग – पिवळा.

सिंह राश‍ी भविष्य (Leo Daily Horoscope) : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणामुळे पैसे अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च सुद्धा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आजचा शुभ रंग – पांढरा.

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Daily Horoscope) : बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. आज मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी चालून येईल. व्यापाऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पांढरा.

तूळ राश‍ी भविष्य (Libra Daily Horoscope) : मीडिया आणि आयटी क्षेत्रातील लोकांना यश मिळेल. धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवनात सुख प्राप्त होईल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग पांढरा

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामात चांगले यश प्राप्त होईल. वायफळ खर्च टाळा. प्रवासाचा योग लवकरच निर्माण होईल. आजचा शुभ रंग – लाल.

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : नातेवाईक आणि जोडीदारांची चांगली साथ मिळेल. कार्यालयातून दिलेलं काम पूर्ण कराल. प्रवासाचा किंवा पर्यटनाचा योग दुपारनंतर निर्माण होईल. आजचा शुभ रंग – पांढरा.

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : आज धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. भाऊ तसेच इतर नातेवाईकांसोबत सुरू असलेल्या व्यवहारात चांगला लाभ होईल. कामाच्या व्यापामुळे ताण जाणवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – केशरी.

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : आज वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. जीभेवर ताबा ठेवा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नव्या कामाची सुरूवात करण्यास आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग – निळा.

मीन राश‍ी भविष्य (Pisces Daily Horoscope) : आज शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मन प्रसन्न असेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतील. साहित्य, कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असेल. आजचा शुभ रंग – पिवळा

 

Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 30 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x