7 August 2020 8:55 AM
अँप डाउनलोड

कर्नाटक: सत्तेसाठी चड्य्या, चादरी व उशा घेऊन भाजपा आमदारांचा विधानसभेतच मुक्काम

Karnataka, chief minister kumarswamy, B. S. Yeddyurappa, Siddaramaiah

बंगळुरू : कर्नाटक राज्यात आमदार फोडाफोडीच्या राजकारणाने कळस गाठल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्यांना सहज उपलब्ध नसणारे प्रतिनिधी आणि पंचतारांकित आयुष्य जगणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्तेच्या लालसेपोटी विधानसभेत चड्य्या, चादरी व उशा घेऊन मुक्कामाला पोहोचले आहेत. भारतीय लोकशाही अक्षरशः टांगणीला लावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

दरम्यान गुरुवारी कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. परंतु यावरुन विधानसभेत गोंधळ झाल्याने कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आले. गुरुवारी काँग्रेस आणि जेडीएसचे पंधरा बंडखोर आमदार अनुपस्थित होते. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी विधानसभेतच ठिय्या दिला होता. उशा, चादरी घेऊन भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी कर्नाटक विधानसभेतच मुक्काम केला. आज सकाळी काही आमदार मॉर्निंग वॉकला देखील गेले होते.

दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत राज्यपालांनी दिली आहे. गुरुवारी संध्याकाळनंतर कर्नाटक विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे आमदार चादरी आणि उशा घेऊन दाखल झाले. तिथेच त्यांनी जेवणही केले आणि मुक्कामही केला. भारतीय जनता पक्षाचे आमदार चादरी आणि उशा घेऊन विधानसभेत पोहचले होते. आता आज कर्नाटक विधानसभेत काय महाभारत रंगणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#karnatak Assembly Election 2018(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x