भाजपच्या संकटमोचकांना धक्का | खडसेंचा भाजपावर पहिला राजकीय सर्जिकल स्ट्राईक

रावेर, २ नोव्हेंबर: दोन दिवसांपूर्वी भाजपने मुक्ताईनगर मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले होते. त्यात गिरीश महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचा एकही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही असं वक्तव्य केलं होतं. भारतीय जनता पक्षाने मागील काही दिवसात घेतलेले पक्ष मेळावे वाया गेल्याच चित्र आहे, कारण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला नव्हे तर राष्ट्रवादीला महत्व देत एकनाथ खडसे यांचावर विश्वास दाखवला आहे.
कारण राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात भारतीय जनता पक्षाला राजकीय हादरे देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जळगावात विस्तार करण्याचं वचन त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी दिलं होतं. भारतीय जनता पक्षाचा एकही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही असं म्हणणाऱ्या भाजपच्या संकट मोचकांना म्हणजे गिरीश महाजनांना मोठा धक्का दिला आहे. कारण जिल्ह्यातील एक-दोन नव्हे तर तब्बल 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.
त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला राजकीय धक्के बसण्यास आणि राष्ट्रवादीचा पक्ष विस्तार होण्यास सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे सध्या जरी पदाधिकाऱ्यांचे पक्ष प्रवेश होत असले तरी भविष्यात आजी-माजी आमदार राष्ट्रवादीत आणून एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रात भाजप एकावर एक राजकीय धक्के देण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यासंदर्भात त्यांनी पक्ष प्रवेशावेळी संकेत दिले होते.
रावेर तालुक्यातील 60 भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरू झाली आहे.
News English Summary: Two days ago, the BJP had organized a gathering of office bearers and activists in Muktainagar. In it, Girish Mahajan had stated that not a single office bearer of the Bharatiya Janata Party would leave the party. The party rallies held by the Bharatiya Janata Party (BJP) in the last few days have been wasted, as BJP functionaries have shown faith in Eknath Khadse by giving importance to the NCP and not the BJP.
News English Title: NCP Leader Eknath Khadse hits BJP 60 workers join NCP in Mukatatinagar Jalgaon News Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL