30 April 2024 7:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

शिवाजी पार्कचं नामांतर | आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क नावाची पाटी लागणार

Mumbai BMC, Historical Shivaji Park, Chhatrapati Shivaji Park

मुंबई, १४ नोव्हेंबर: मुंबई दादरमधील प्रसिद्ध शिवाजी मैदानाचं नाव अखेर अधिकृतपणे बदलण्यात आलं आहे. यापुढे शिवाजी पार्क मैदान ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ या नावाने ओळखले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून या मैदानाला अधिकृत पाटी लावण्यात आली आहे. या मैदानाच्या नामांतराचा प्रस्ताव मार्च महिन्यात पालिका सभागृहात मांडण्यात आला होता.

मोठा इतिहास असलेल्या आणि १०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या मैदानात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसहित अनेक राजकीय पक्षांच्या जाहीर सभा होतात. सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेचेही आयोजनही या मैदानात होते. १० मे १९२७ रोजी मैदानाला शिवाजी पार्क असे नाव देण्याचा ठराव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यामुळं तब्बल ७३ वर्षांनी शिवाजी पार्क मैदानाचे नाव बदलण्यात आलं आहे.

तत्पूर्वी दादरच्या शिवाजी पार्कचे पहिले नाव माहिम पार्क असं होतं. त्यानंतर म्हणजे १० मे १९२७ रोजी मैदानाचं नामांतर शिवाजी पार्क असं करण्याचा ठराव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. मात्र समस्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्यामुळे मैदानाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे शिवाजी पार्कचे छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे नामकरण करण्यासाठी शिवसेनेने मुंबई पालिकेकडे पाठपुरावा केला होता.

 

News English Summary: The famous Shivaji Maidan in Mumbai Dadar has finally been officially renamed. Shivaji Park ground will henceforth be known as ‘Chhatrapati Shivaji Maharaj Park’. A few days ago, an official board has been installed on this ground by the Municipal Corporation. The proposal to rename the ground was tabled in the corporation hall in March.

News English Title: Mumbai BMC has changed the name of historical Shivaji Park News updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x