4 May 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट
x

सत्तेसाठी लाज आणि हिंदुत्व विकले | मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर बिघडले कुठे? - भाजप

BJP MLA Atul Bhatkhalkar, Shivsena, MLA Bhaskar Jadhav

मुंबई, १७ नोव्हेंबर: माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस देखील हफ्त घेत नाहीत का? असं धक्कादायक विधान केले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. भास्कर जाधवांचं हे विधान 8 नोव्हेंबर 2020 रोजीचं आहे. सध्या त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल देखील होत आहे. तसेच फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका. पहिली म्हणजे मुलींची छेडछाड आणि दुसरी म्हणजे चोरी. ‘बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी आहे’, अशी पुष्टी देखील यावेळी जाधव जोडली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकावर कारवाई होत नाही. पण, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होते? असा सवाल देखील केला आहे. दरम्यान, एका माजी मंत्र्यानं, विद्यमान आमदारानं केलेल्या विधानाचा अर्थ काय? जबाबदार लोकप्रतिनिधीला हे विधान शोभतं का? असा सवाल सध्या जिल्ह्याच्या राजकारणात केला जात आहे. लॉकडाऊनमध्ये शिवसेना उपतालुकाप्रमुखाला अवैध दारू विकताना पोलिसांनी पकडलं होतं. त्याचा संदर्भ घेत भास्कर जाधव यांनी हे विधान केले आहे.

दरम्यान भास्कर जाधव यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावरुन शिवसेनेवर टीकास्त्र केले आहे. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? कार्यकर्त्याच्या समर्थनार्थ माजी मंत्री, सेना आमदार भास्कर जाधवांचं धक्कादायक विधान… हो बरोबर आहे नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली, हिंदुत्व विकले आणि इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर बिघडले कुठे ?, असा प्रश्न भातखळकरांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.

 

News English Summary: What happens if you sell alcohol for a living? Former Minister, Sena MLA Bhaskar Jadhav’s shocking statement in support of activists … Yes, it is true. Leaders sold shame for power, sold Hindutva and sat on the lap of Italian Congress said BJP MLA Atul Bhatkhalkar.

News English Title: BJP MLA Atul Bhatkhalkar criticized Shivsena over statement of MLA Bhaskar Jadhav News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x