29 April 2024 5:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ | समाज माध्यमांवर सुप्रिया सुळेंची बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल

NCP MP Supriya Sule, fake audio clip, Social media

औरंगाबाद, ३० नोव्हेंबर: औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण हे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule’s Fake Audio Clip) या चव्हाण यांच्याविरोधात प्रचार करत असल्याची एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावानं फेक मोबाइल नंबर देखील शेअर करण्यात आला आहे. त्या चुकीच्या माहितीद्वारेच सदर क्लिप शेअर केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ह्या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. विरोधकांचा हा रडीचा डाव असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

फेसबुक लाइव्हमध्ये म्हणतात, “मला काही सहकाऱ्यांचा आणि चॅनेलमधून फोन आले. उस्मानाबाद आणि लातूरच्या काही भागामध्ये माझ्या आवाजाचा आणि खोटा मोबाईल नंबर वापरून आणि लिहून काही लोक प्रचार करत आहेत. त्याचा गैरवापर होत आहे. हे खरंच दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात इतकी पातळी सोडून आज आमचे विरोधक प्रचार करत आहेत.

मी तातडीनं पोलीस यंत्रणेची मदत घेतलेली आहे (NCP MP Supriya Sule’s Fake Audio Clip). त्याचबरोबर निवडणूक आयोगाशीही संपर्क साधलेला आहे. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण म्हणून उमेदवार आहेत, यांनाही मी तातडीनं संपर्क साधलेला आहे. विरोधक जो काही रडीचा डाव खेळत आहेत, तो दुर्दैवी आहे. पदवीधरची ही निवडणूक आहे, औरंगाबादचे आमचे उमेदवार आहेत. कुठलाच विषय राहिला नाही म्हणून विरोधक इतकी पातळी सोडून माझ्या नावाचा गैरवापर करून एक फेक अकाऊंट, फेक नंबर वापरून आज ते प्रचार करत आहेत.

 

News English Summary: Satish Chavan of Shiv Sena, NCP and Congress Mahavikas Aghadi is the official candidate from Aurangabad graduate constituency. Meanwhile, an audio clip of NCP MP Supriya Sule campaigning against Chavan has gone viral on social media. A fake mobile number has also been shared in the name of MP Supriya Sule. This clip is being shared with that wrong information. MP Supriya Sule has strongly protested against all this. MP Supriya Sule, while reacting to the media, said that this was a ploy of the opposition.

News English Title: NCP MP Supriya Sule fake audio clip gone viral on social media news updates.

हॅशटॅग्स

#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x