12 April 2021 7:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

संजय राठोड प्रकरणावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Shivsena MP Sanjay Raut, Forest Minister Sanjay Rathod, Pooja Chavan

मुंबई, १६ फेब्रुवारी: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय सरकारचा असून याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होईल, असे राऊत यांनी सांगितले.

राऊत म्हणाले की, हा विषय सरकारचा आहे आणि सरकारचे प्रमुख लोक त्यासंबंधात त्यांचं मत व्यक्त करतील किंवा निर्णय घेतील. तसेच संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख मंत्री आहेत, शिवसेनेचा चेहरा आहेत. त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याप्रकरणी पोलीस तपासाचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यासंबंधीची माहिती मुख्यमंत्री घेतील. दरम्यान माध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊत यांना संजय राठोडांच्या राजीनाम्याविषयी विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राजीनामा दिला की नाही हे मला माहिती नाही, तुम्हाला याची जास्त माहिती असेल.

 

News English Summary: Forest Minister and Shiv Sena leader Sanjay Rathod, who was embroiled in controversy over the Pooja Chavan suicide case, has finally resigned. According to sources, Sanjay Rathod has sent his resignation to Matoshri. Meanwhile, Shiv Sena leader and MP Sanjay Raut has given his first reaction on the issue. “This is a government matter and a decision will be taken at the government level,” Raut said.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut reaction over Forest Minister Sanjay Rathod resignation news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(211)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x