खेड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोंकण दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेऊन, त्यांच्या आणि स्थानिकांच्या समस्या समजून घेत आहेत. त्यावेळी पक्षाने केलेल्या कामाचे लोकार्पण सुद्धा त्यांच्या हस्ते केलं जात आहे. परंतु अशाच एका लोकार्पण सोहळ्यात वेगळाच अनुभव पाहावयास मिळाला.

मनसेचे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडकर यांनी खेड येथे जिल्हा परिषदेच्या पूर्वप्राथमिक शाळेच्या इमारतीचं उदघाट्न राज ठाकरे यांच्या हस्ते फीत कापून ही इमारत लोकार्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु राज ठाकरे यांचं नियोजित ठिकाणी आगमन होताच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक विद्यार्थी सुद्धा कुतूहलाने तेथे आले होते.

चिमुकल्या विद्यार्थ्यांचा तो उत्साह पाहून राज ठाकरेंनी त्या जिल्हा परिषदेच्या पूर्वप्राथमिक शाळेच्या इमारतीचं उदघाट्न त्या विद्यार्थ्यांच्या हातून करून घेतलं. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रचंड आनंद झाला.

Raj Thackeray inaugurated a new school building at Khed