3 May 2025 2:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

बहुतांश मुली लिव्ह इन रिलेशनशिप संपले की बलात्काराची तक्रार करतात - किरणमयी नायक

Girls file FIR, Rape, after living relationship

बिलासपूर, १३ डिसेंबर: देशात महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा सातत्यानं चर्चेत आहे. महिलांवरी अत्याचार आणि बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच एका जवाबदारीच्या पदावर बसलेल्या महिलेच्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानांवरून वाद निर्माण झाला आहे. “बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात,” असं विधान अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं आहे.

“जर एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर अशावेळी मुलींनी हे बघायला हवं की ती व्यक्ती त्यांना जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. परंतु जेव्हा त्यांचे असे हे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश घटनांमध्ये महिला पोलीस ठाण्यात धाव घेतात” असं नायक यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराबाबत उपस्थित प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना असं म्हटलं आहे.

किरणमयी नायक यांनी “बहुतांश घटना अशा आहेत की लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. मी महिला/मुलींना आवाहन करते की, त्यांनी आधी नातं समजून घ्यावं. जर तुम्ही अशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आहात, त्याचा परिणाम वाईटच होईल. सहमतीने संबंध ठेवल्यानंतर नातं तुटल्यानंतरच्या अनेक घटना आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप संपतात तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात” असं म्हटलं आहे.

 

News English Summary: The issue of atrocities against women is constantly being discussed in the country. While expressing concern over the rising incidence of atrocities and rape against women, the statements of a woman in a responsible position have sparked a new controversy. Controversy has erupted over the statements made by the chairperson of the Chhattisgarh State Women’s Commission. “Most of the girls first have sex on their own and then accuse men of raping them after the breakup,” said Kiranmayi Nayak, the Speaker of the Legislative Assembly.

News English Title: Mostly girls file FIR for rape after living relationship finished said Kiranmayee Nayak news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या