13 April 2021 6:14 PM
अँप डाउनलोड

राजस्थान: भाजपकडून काँग्रेस आमदारांना आर्थिक प्रलोभन, ACB'त तक्रार

Congress MLAs, Jaipur hotel, CM Ashok Gehlot, BJP Rajasthan

भोपाळ, ११ जून: देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना राजस्थानात मात्र भाजपा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात मश्गुल आहे. राजस्थानमध्ये मोठे आर्थिक प्रलोभन दाखवत काँग्रेस आणि अपक्ष आमदारांना फोडण्याचा भाजपा प्रयत्न करीत आहे. तशी तक्रारच राजस्थान विधानसभेचे मुख्य प्रतोद आणि काँग्रेस आमदार महेश जोशी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आमदार महेश जोशी यांनी भाजपचे थेट नाव न घेता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या धर्तीवर राजस्थानातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. काही काँग्रेस आमदारांना आणि अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांची सौदेबाजी केली जात आहे. त्यासाठी त्यांना सतत फोन करून मोठे आमिष दाखवले जात आहे. लोकशाही पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे जोशी यांनी या पत्रात म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आलोक त्रिपाठी यांनी त्यांना पत्र मिळाले असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काँग्रेसने त्यांच्या आमदारांना बुधवारी जयपूरच्या एका हॉटेलमध्ये थांबवले आहे. आमदार भाजपच्या संपर्कात येऊ नये यासाठी काँग्रेसने ही खबरदारी घेतली आहे. याचदरम्यान वसुंधरा राजे यांच्या संपर्कात असलेल्या अपक्ष आमदारांवरही मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी नजर ठेवली आहे. काही अपक्ष आमदार काँग्रेसला समर्थन देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे बंडखोर नेते आणि अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला यांनी आम्ही अशोक गहलोत यांच्यासोबत आहोत असं सांगितले आहे. वसुंधरा राजे यांच्या निकटवर्तीय असल्याचं विचारलं असता त्यांनी वेळेसोबत निर्णय घ्यावे लागतात असं सांगितले. तसेच त्यांनी पैशांची ऑफर असल्याचाही नकार दिला.

 

News English Summary: While corona is prevalent across the country, the BJP is busy trying to gain power in Rajasthan. In Rajasthan, the BJP is trying to oust the Congress and independent MLAs by showing big financial temptations. The same complaint has been lodged by Rajasthan Legislative Assembly chief and Congress MLA Mahesh Joshi with the Director General of Bribery Prevention.

News English Title: Congress MLAs sent Jaipur hotel AM Ashok Gehlot alleges BJP Rajasthan News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(474)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x