19 May 2024 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Rahul Gandhi in Manipur | भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर प्रशासनाने राहुल गांधी यांचा ताफा रोखला, जनतेची समर्थनार्थ घोषणाबाजी

Rahul Gandhi in Manipur

Rahul Gandhi in Manipur | मणिपूरमध्ये ३ मेपासून जातीय संघर्ष सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. २९ आणि ३० जून रोजी ते मणिपूरमध्ये राहणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये फिरकले नसून, भाजपाची सत्ता असूनही मोदी सरकार हिसाचार थांबविण्यात नापास झाले आहेत. दरम्यान, हिंसाचार सुरू झाल्यानंतर राहुल गांधी यांची ही पहिलीच मणिपूर भेट आहे.

दरम्यान, भाजपाची सत्ता असलेल्या प्रशासनाकडून राहुल गांधी यांचा ताफा बिष्णुपूरजवळ रोखण्यात आला, त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरने जाण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी इम्फाळ आणि चुराचंदपूर मध्ये ते हिंसाचारात बळी गेलेल्या लोकांना भेटणार आहेत आणि मदत शिबिरांना ही भेट देतील. मणिपूरमधील हिंसाचार आणि संकटासाठी काँग्रेसने भाजपला जबाबदार धरले आहे.

राहुल गांधींचा ताफा का रोखण्यात आला हे स्पष्ट करताना बिष्णुपूरचे एसपी हेस्नाम बलराम सिंह म्हणाले की, “जमीनी परिस्थिती पाहून आम्ही त्यांना (राहुल गांधी) पुढे जाण्यापासून रोखले आणि त्यांना हेलिकॉप्टरने चुराचंदपूरला जाण्याचा सल्ला दिला. राहुल गांधी ज्या महामार्गावरून जात आहेत, त्या महामार्गावर ग्रेनेड हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन आम्ही त्यांना परवानगी दिलेली नाही असं सांगण्यात आले आहे.

मणिपूरमधील बिष्णुपूरजवळ राहुल गांधी यांच्या ताफ्याला पोलिसांनी रोखल्यानंतर काँग्रेसने गुरुवारी सरकारवर निशाणा साधला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीय हिंसाचारग्रस्तांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी हुकूमशाही मार्गाचा वापर केल्याचा आरोप केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, सरकारची ही कृती पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि सर्व घटनात्मक आणि लोकशाही मूल्यांचे उल्लंघन करते. मणिपूरमध्ये राहुल गांधी यांच्या ताफ्याला बिष्णुपूरजवळ पोलिसांनी अडवले आहे, असे खर्गे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हिंसाचारग्रस्त भेटण्यासाठी आणि संघर्षग्रस्त राज्याला दिलासा देण्यासाठी मदत छावण्यांना भेट देत आहेत.

पंतप्रधान मोदींनी मणिपूरबाबत मौन तोडण्याची तसदी घेतलेली नाही. त्यांनी हे राज्य स्वत:च्या नशिबावर सोडले आहे. आता त्यांची दुटप्पी सरकारे राहुल गांधींची पोहोच रोखण्यासाठी हुकूमशाही मार्गाचा अवलंब करत आहेत. हे पूर्णपणे अमान्य आहे. मणिपूरला संघर्षाची नाही तर शांततेची गरज आहे असं खर्गे म्हणाले.

News Title : Rahul Gandhi in Manipur for 2 days check details on 29 June 2023.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi in Manipur(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x