पालघर निवडणूक, एका रात्रीत ६.७२% मतं वाढली? शिवसेना
मुंबई : पालघर पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर १२ तासात तब्बल ८२,००० मतं वाढली कशी असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांकडे व्यक्त केला आहे. एकुण मतांमध्ये पालघर पोटनिवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी एका रात्रीत ६.७२ टक्के इतकी मतं वाढवून सांगितल्याचा गंभीर आरोप आज शिवसेनेच्या सामना मुखपत्रातुन करण्यात आला आहे.
पालघरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी पालघरमधील लोकसभा पोटनिवडणूकचे मतदान पार पडल्यानंतर जिल्ह्यातील ६ विधानसभा क्षेत्रातील सर्वच मतदान केंद्रावरून आणि बुथवरील माहिती गोळा केली. त्यादरम्यान एकूण ४६.५० टक्के ही मतदानाची आकडेवारी समोर आली. परंतु या आकडेवारीत जास्तीत जास्त १-२ टक्क्यांच्या फरक असू शकतो असं गृहीत असत.
परंतु एका रात्रीत १-२ टक्के नव्हे तर तब्बल ६ टक्के मतं कशी काय काढली? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या एकूणच प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. कारण आयोगाने प्रसिद्ध केलेल्या सोमवारच्या प्रेसनोटमध्ये ८,०४,९५० इतक्या मतदारांनी मतदान केल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु पुन्हा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये त्यांनी हा आकडा ८, ८७, ६८७ मतदारांनी मतदान केल्याचे प्रसिद्ध केले. म्हणजे तब्बल ८२,७३७ इतक्या मोठ्या फरकाने मतदान वाढले.
एकूणच पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत आधीच घट झाल्याने सर्वच पक्षांसाठी एक एक मत हे अमूल्य ठरणार आहे. मात्र एका रात्रीत याच टक्केवारीचा चमत्काराचा आकडा तब्बल ५३.२२ इतका प्रचंड फुगला आहे. त्यामुळे सामनामध्ये ही वाढलेली मतं कोणाला तारणार यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल