3 May 2024 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

WhatsApp Updates | लवकरच multi-device support हे नवे फिचर येणार

Whatsapp Updates, New Feature, multi device support

मुंबई, २७ डिसेंबर: व्हॉट्सॲप हे लोकप्रिय ॲप नवनवे फिचर्स सादर करुन आपल्या युजर्संना खुश करत असतं. आता व्हॉट्सॲप एका नव्या फिचरचे टेस्टिंग करत आहे. मल्टी डिव्हाईस सपोर्ट असे या फिचरचे नाव असून यामुळे व्हॉट्सॲप मल्टीपल डिव्हाईसेस वर चालवणे शक्य होणार आहे. दरम्यान, या फिचरची सर्वजण खूप काळापासून वाट पाहत होते. व्हॉट्सॲपचे नवे फिचर ट्रॅक करणाऱ्या WABetainfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप या फिचरचे टेस्टिंग करत असून व्हॉट्सॲप मल्टिपल डिव्हाईसेसवर सेटअप असल्यावर सुद्धा कॉल रिसिव्ह होऊ शकतो. (Whatsapp to launch new multi device support feature soon info shared by WABetainfo)

व्हॉट्सॲपच्या या फिचरबद्दल WABetainfo ने ट्विटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप अकाऊंट मल्टी डिव्हाईस वर कॉन्फिंगर करुन व्हॉट्सॲपच्या कॉल्सची वेगवेगळ्या डिव्हाईसेसवरुन टेस्टिंग चालू आहे. या फिचरची रिलीज डेट अद्याप व्हॉट्सॲपने रिलीज केलेली नाही. मल्टी डिव्हाईस फिचर अॅक्टीव्हेट झाल्यानंतर तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असलेल्या सर्व डिव्हाईसेसवर एकाच वेळी एक मेसेज येईल. त्यासोबत तुम्ही केलेल्या सर्व अॅक्शन्स, रिप्लाय, डाऊनलोड केलेल्या व्हिडिओज आणि इमेजेस सर्व डिव्हाईसवर सिंक राहतील.

यापूर्वी व्हॉट्सॲपने QR कोड स्कॅन करुन डेक्सटॉपवर व्हॉट्सॲप चालवण्याचे ड्युअल फिचर सादर केले होते. याच फिचरचे अपग्रेडेट व्हर्जन हे मल्टी डिव्हाईस सपोर्ट हे आहे. या नव्या फिचरवरती व्हॉट्सॲप जवळपास वर्षभरापासून कार्यरत आहे. WABetainfo ने यापूर्वी दिलेल्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप अकाऊंट तुम्ही चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर एकाच वेळी पाहू शकाल. विशेष म्हणजे प्रायमरी डिव्हाईस इंटरनेटला कनेक्टेड नसेल तरी इतर डिव्हाईसेसवर तुम्ही मेसेज सेंड किंवा रिसिव्ह करु शकता.

 

News English Summary: WhatsApp is a popular app that makes its users happy by introducing new features. Now WhatsApp is testing a new feature. This feature is called Multi Device Support and will make it possible to run WhatsApp on multiple devices. Meanwhile, everyone has been waiting for this feature for a long time. According to WABetainfo, a website that tracks WhatsApp’s new features, WhatsApp is testing the feature and calls can be received even if WhatsApp is setup on multiple devices.

News English Title: Whatsapp to launch new multi device support feature soon news updates.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x