8 May 2024 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

मोदी सरकारची माय स्टँप योजना | टपाल तिकिटावर गँगस्टर छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी

Modi Govt, Postal stamps, Chhota Rajan, Munna Bajrangi

नवी दिल्ली, २८ डिसेंबर: भारत सरकार अनेक योजना लागू करतं त्यातून सरकारचा आणि सामान्यांचा काही लाभ करून घेणं हा हेतू असतो. त्याप्रमाणेच २०१७ मध्ये केंद्रातील मोदी सरकारनं माय स्टँप योजना सुरू केली होती. सदर योजनेच्या माध्यमातून एखादी भारतीय व्यक्ती ३०० रुपये शुल्क भरून स्वत:चा किंवा स्वत:च्या कुटुंबीयांचा फोटो टपाल तिकिटावर छापून घेऊ शकते. शुल्क जमा केल्यावर भारत टपाल विभाग १२ तिकिटं जारी करतो. ही तिकिटं इतर टपाल तिकिटांप्रमाणेच असतात. त्यांचा वापर करून तुम्ही देशात कोणाला देखील पत्र पाठवू शकता. (Modi Govt Postal stamps of Chhota Rajan and Munna Bajrangi released in Kanpur)

मात्र या जोणनेमुळे टपाल खातंच टीकेचं धनी ठरलं आहे. कारण भारतीय टपाल विभागानं ‘माय स्टँप’ योजनेच्या अंतर्गत छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेले टपाल तिकिटं छापली आहेत. केवळ पाच रुपयाचं मूल्य असलेली छोटा राजनची १२, तर मुन्ना बजरंगीची १२ तिकिटं छापण्यात आली आहेत. टपाल विभागाला यासाठी ६०० रुपयांचं शुल्क मिळालं आहे. तिकिटं छापण्याआधी फोटोंची पडताळणी गरजेची होती. परंतु टपाल विभागानं कोणत्याही प्रकारची पडताळणी केली नाही. कानपूरच्या मुख्य टपाल कार्यालयात सदर प्रकार घडला आहे.

 

News English Summary: The Indian Postal Department has printed postage stamps with photos of Chhota Rajan and Munna Bajrangi under the ‘My Stamp’ scheme. 12 tickets of Chhota Rajan worth Rs. The postal department has received a fee of Rs. 600 for this. The photos had to be verified before the tickets could be printed. However, the postal department did not carry out any verification.

News English Title: Modi Govt Postal stamps of Chhota Rajan and Munna Bajrangi released in Kanpur News updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x