13 May 2025 7:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदार वर्ग या फंडातून 4-5 पटीने परतावा मिळवतोय, फंडाचे नाव सेव्ह करा, करोडोत कमाई Jio Finance Share Price | जिओ मेरे लाल! तुटून पडले गुंतवणूदार, शेअर्समध्ये 5.38% तेजी, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Adani Power Share Price | खुशखबर, 48% परतावा मिळवा, अशी संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ADANIPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनीचा शेअर देऊ शकतो मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL BEL Share Price | असा शेअर पोर्टफोलिओमध्ये असावा, मिळेल मोठा परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: BEL CDSL Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: CDSL Alok Industries Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, हा पेनी स्टॉक देईल मजबूत परतावा - NSE: ALOKINDS
x

भीमा-कोरेगाव प्रकरणी धरपकड सुरू

पुणे : एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे तसेच त्यांच्या सोबत इतर ३ जणांना सुद्धा अटक झाली आहे. सुधीर ढवळे यांना सकाळी ६ च्या सुमारास पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरून अटक केली आहे.

सुधीर ढवळे यांच्या व्यतिरिक्त नागपूर येथील वकील सुरेंद्र गडलींग आणि माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना यांना देखील अटक करण्यात आलं आहे. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तेथे प्रक्षोभक भाषण करण्यात आली होती असा आरोप आहे.

परंतु संभाजी भिडें यांना अटक न करता उलट भीमा-कोरेगाव शौर्य प्रेरणा अभियानाच्या आयोजकांना अटक झाल्याने त्याचा निषेध म्हणून देवनार पोलीस स्थानकाबाहेर गर्दी जमायला सुरु झाली असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदे आयोजित करण्यात आली होती त्याला जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालीद, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, माजी न्यायमूर्ती बी़ जी़ कोळसे पाटील आणि प्रकाश आंबेडकर आदि सहभागी झाले होते. या परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी भीमा-कोरेगाव दंगल दंगल उसळली होती. नंतर त्याच लोण संपूर्ण राज्यभर पसरलं होत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bhima Koregaon(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या