5 May 2024 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

पुढच्या 48 तासात गांगुलीवर आणखी एक एन्जियोप्लास्टी | प्रकृती स्थिर

Sourav Ganguly, health doctor, bypass surgery

कोलकत्ता, ०३ जानेवारी: भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या तब्येतीबाबत वूडलॅन्ड्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढच्या 48 तासात गांगुलीवर आणखी एक एन्जियोप्लास्टी करण्यात येईल. याबाबतचा निर्णय डॉक्टर देतील. पुढच्या आठवड्यामध्ये गांगुलीला डिस्चार्ज मिळू शकतो, तसंच त्याची बायपास सर्जरी करण्याची बहुतेक गरज पडणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच डिस्चार्ज मिळाल्यानंतर गांगुलीला एक महिना विश्रांती घ्यावी लागेल, त्यानंतरच तो नेहमीप्रमाणे आयुष्य जगू शकतो, असं वूडलॅन्ड्स रुग्णायलाच्या सीईओ रुपाली बसू यांनी सांगितलं.

सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. त्याला कशाचाही धोका नाही. गांगुली सध्या विश्रांती घेत आहे. गांगुलीचा रक्तदाब 110/70 इतका आहे. तसेच ऑक्सिजन लेवलही 98 इतकी आहे. गांगुलीवर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी करण्याची आवश्यकता आहे. कारण एकूण हार्ट ब्लॉक काढण्यात आले नाहीत. काही वेळात अँजियोप्लास्टी करण्यात येणार आहे”, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

सौरव गांगुलीला Triple vessel disease ची बाधा आहे. यामुळे गांगुलीच्या हृदयाला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. यामुळेच त्याला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

 

News English Summary: Doctors at Woodlands Hospital have given important information about the health of former India captain and BCCI president Sourav Ganguly. Another angioplasty will be performed on Ganguly in the next 48 hours. The doctor will decide. Ganguly is expected to be discharged next week and will not have to undergo bypass surgery, doctors said. After being discharged, Ganguly will have to rest for a month, after which he will be able to lead a normal life, said Rupali Basu, CEO of Woodlands Hospital.

News English Title: Sourav Ganguly health doctor said he may not require bypass surgery news updates.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x