3 May 2024 4:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये एनडीए फुटीच्या उंबरठ्यावर?

नवी दिल्ली : २०१९ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूका लक्षात घेता सध्या बिहारमध्ये होणाऱ्या राजकीय घडामोडी एनडीएला डोकेदुखी ठरू शकतात. कारण भाजपप्रणीत एनडीए बिहारमध्ये फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे समजतं.

भाजप मित्र पक्षांना एकत्र करण्यासाठी धडपडत असताना बिहारमध्ये वेगळाच राजकीय उभा झाला आहे. कारण नितीश कुमारांच्या एनडीए मध्ये सामील होण्यामुळे जागा वाटपाचा घोळ वाढू शकतो. त्याची पहिली चुणूक म्हणजे भाजपने आयोजित केलेल्या मेजवानीस राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा हे अनुपस्थित राहणार असल्याचे समजते.

त्यात संयुक्त जनता दलाकडूनही जागावाटपामध्ये तब्बल २५ जागांसाठी हट्ट होत असल्याने बिहारमध्ये एनडीए फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. जवळपास ८ वर्षानंतर बिहारमध्ये एकत्र येणारे एनडीएमधील घटक पक्ष आतापासूनच नाराज होऊ लागल्याने राजकीय घडामोडींनी जोर धरला आहे. बिहारमधील मित्र पक्षांच्या या नाराजीमुळे भाजपची डोकेदुखी मात्र थांबताना दिसत नाही.

जर बिहारमध्ये एनडीएला नीतिश कुमार यांच्या नेतृत्वाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना जेडीयूसोबत आधी न्याय करावा लागेल असा इशारा वजा आग्रह जनता दल युनायटेडचे नेते श्याम रजक यांना धरला आहे. त्यांनी तब्बल २५ जागांची मागणी केली आहे. पण बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत आणि त्यासाठी आधीच इशारे सुरु झाले आहेत. एकूणच बिहारमधील राजकीय हालचाली भाजपसाठी डोकेदुखी वाढविणार हे नक्की आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x