7 May 2024 5:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

अर्णबचं चॅट | पुलवामा हल्ला ते लोकसभा २०१९ | राज ठाकरेंचा तो आरोप आज...

MNS Chief Raj Thackeray, Pulwama attack, Arnab Goswami, Whatsapp chat

मुंबई, १६ जानेवारी: टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात घडलेल्या घटनेत रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या व्हाट्सअँप संवादाचा 500 पानी दस्तऐवज सोशल मीडियावर लीक झाल्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संबंधित चॅटमध्ये गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय आणि सत्तारूढ सरकारच्या सदस्यांशी जवळीक, टीआरपी त्यांच्या बाजूने झुकवणे आणि भाजपा सरकारची मदत घेण्याचे प्रयत्न आणि बरेच काही समोर येतं आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे पुलवामा हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते तेव्हा देश हळहळला होता. मात्र अर्णब अत्यंत खुश झाला होता हे त्यांच्या चॅट वरून सिद्ध होतंय. 14 फेब्रुवारी 2019 च्या एका चॅटमध्ये गोस्वामी म्हणतात “हा हल्ला आम्ही वेड्याप्रमाणे जिंकला आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर CRPF जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तब्बल 40 जवान शहीद झाले होते, त्याच दिवशी हा संवाद झाल्याने अर्णब गोस्वामी किती भीषण माणूस आहे याचा प्रत्यय आला आहे.

विशेष म्हणजे त्यानंतर बालाकोट स्ट्राईकच्या तीन दिवस आधीच अर्नबला त्याची माहिती असल्याचं चॅट मध्ये दिसतंय. देशाच्या सिक्रेट लष्करी कारवाईबद्दल त्याला माहिती कशी प्राप्त झाली आणि त्याचा थेट संबंध पीएमओ’शी जोडला जाऊ लागल्याने मोदींनी पायउतार व्हावं अशी मागणी समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. मात्र यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळी केलेल्या धक्कादायक आरोपाला दुजोरा मिळाला आहे. कारण देशाच्या सिक्रेट लष्करी कारवाईबद्दल एकतर स्वतः लष्कर, पीएमओला आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना माहिती असते. मात्र तीच माहिती अर्णब गोस्वामींकडे कुठून आली. त्यातही पुलवामा हल्ला होताच देशभर दुःख व्यक्त होतं असताना अर्णब गोस्वामी आनंदी असल्याचं त्यांच्या चॅटमध्ये समोर आलं आहे.

लोकसभा २०१९ निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलं होतं. त्यात पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले होते आणि त्यामुळे पाकिस्तानविरोधात देशभरात रोष व्यक्त करण्यात येतं होता. त्याचवेळी पाकिस्तान विरोधात वातावरण तापलेले असताना राज ठाकरे यांनी एक धक्कादायक विधान केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं आणि त्यांच्यावर प्रचंड टीका देखील झाली होती.

मोदी सरकारच्या काळात अगदी नोटबंदीपासून ते पुलवामा हल्ल्यापासून सर्वच गंभीर विषयांमधील वास्तव उघड करायचं असेल तर आधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची सखोल चौकशी करा, म्हणजे सगळंच सत्य समोर येईल असं खबळजनक विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. निवडणुका जवळ येतील तशा मोठ्या घटना घडवल्या जातील आणि तुमचं लक्ष त्याकडे वळवलं जाईल. नोटाबंदी, राफेल प्रकरण जनता विसरावी यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे जनतेनं जागं राहावं, असंही त्यांनी नमूद केलं होतं. अनेक विरोधकांनी यापूर्वी अजित डोभाल यांच्या मुलाची पाकिस्तानी कंपनीत गुंतवणूक आणि पार्टनरशिप असल्याचा आरोप केला होता.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. पुलवामातील शहीद हे राजकीय बळी आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी करा, सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा खळबळजनक दावा त्यांनी कोल्हापुरातील सभेत केला होता.

 

News English Summary: A shocking revelation has surfaced after a 500-page document of Republic TV’s Arnab Goswami’s WhatsApp conversation was leaked on social media in the wake of the massive TRP scam. In the related chat, Goswami’s closeness to the Prime Minister’s Office and members of the ruling government, the TRP’s inclination towards him and his attempts to get help from the BJP government and much more are coming to the fore.

News English Title: MNS Chief Raj Thackeray allegations over Pulwama attack before loksabha election 2019 news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x