8 May 2025 2:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे - राज ठाकरे

MNS Chief Raj Thackeray, Gram panchayat result

मुंबई, २० जानेवारी: शहरी भागातील पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या अशी सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ३६ जागी विजय मिळविला आहे. ही निवडणूक गाजली ती राज्यातील मोठ्या पक्षांनी ग्रामपंचायतींना दिलेल्या मोठ्या निधी वचनाची. मात्र याबाबतीत मनसेच्या उमेदवारांकडे कोणतीही अर्थशक्ती नसताना देखील पक्षाने चांगली कामगिरी केल्याचं मान्य करावं लागेल. कारण ग्राम पंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेणं हा नक्कीच धाडसी निर्णय होता. तो देखील राज्यातील ३ प्रमुख पक्ष एकत्र आणि भाजप सारखा श्रीमंत पक्ष समोर असताना. यामध्ये सर्वात प्रथम दखल घ्यावी लागेल ती यवतमाळ मधील राजू उंबरकर यांच्या कामगिरीची.

कारण यवतमाळमध्ये मनसेला सर्वाधिक यश मिळाले आहे. येथील वणी मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील 15 ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेने जिंकलेल्या 15 ग्रामपंचायतींमध्ये शिरपूर, मोहूर्ली, येनक, खांदला, खांदला, चंडकापुर, बाबापूर, मोहदा, शिंदी, माहागाव , गदाजी बोरी, करणवाडी या गावांचा समावेश आहे.

 

News English Summary: Maharashtra Navnirman Sena, known as an urban party, has started setting foot in rural areas through Gram Panchayats. Reacting to this result, Raj Thackeray said, “Congratulations from the bottom of my heart to all the Maharashtra soldiers who have won the Gram Panchayat elections.” Make the most of the opportunity you have to do something good for your village. I will see you all soon. Raj Thackeray has instructed the workers to be careful.

News English Title: MNS Chief Raj Thackeray talked on gram panchayat result news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या