महाविकास फोडाफोडी? शिवसेनेचे ५ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नगर, ४ जुलै : महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीकाल भेट घेतली होती. महाविकासआघाडीतल्या नाराजीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा काल पार पडली. लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये नाराजी पसरल्याने आणि राज्य अधिकारीच चालवत असल्याच्या भावनेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेनेवर नाराज असल्याने काल बैठका देखील पार पडल्या.
लॉकडाऊनबाबत प्रशासनातील अधिकारी मंत्र्यांशी चर्चा न करताच निर्णय घेत असल्याची तक्रार महाविकासआघाडीच्या नेत्यांची आहे. लॉकडाऊनचा निर्णयही परस्पर जाहीर करण्यात आल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. त्यासंदर्भात पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मुंबईतील जुन्या महापौर बंगल्यावर बैठक झाली.
मात्र आज चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला.
येत्या काही महिन्यांत नगरपंचायतीची निवडणूक होणार असल्याने आमदार लंके यांनी सुरू केलेली ही तयारी असल्याचे सांगण्यात येते. तालुक्याचे आमदार असले तरी शहरावरही वर्चस्व असले पाहिजे, हाच त्यांचा हेतू आहे. अशाच पद्धतीने जामखेडमध्येही तेथील नगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना काही दिवसांपूर्वीच यश आले आहे. फरक एवढाच की जामखेडला भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. तर पारनेरला राज्यातील सत्तेत एकत्र नांदणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत आले आहेत.
पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवार आणि शरद पवार यांचे विश्वासू समजले जातात. शरद पवार लंकेच्या कामावर समाधानी असल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळेच, राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसेनेतील फोडाफोडी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने मान्य केल्याचे सांगण्यात येते. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर औटी पक्षाकडूनही दुर्लक्षितच राहिले आहेत. त्यामुळे पारनेरमधील या फोडाफोडीची शिवसेनेकडून दखल घेतली जाऊन राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होण्याचीही शक्यता नसल्याचे सांगण्यात येते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच लंके यांनी ही संधी साधली आणि पुढील निवडणुकीत पारनेर शहरातील एकहाती वर्चस्वचा मार्ग मोकळा केल्याचे मानले जाते.
News English Summary: 5 Shiv Sena corporators joined NCP. Parner’s Shiv Sena corporators have joined the party in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar. Corporator Dr. Muddassir Syed, Nandkumar Deshmukh, Kisan Gandhade, Vaishali Auti, Nanda Deshmane have joined the NCP and accepted the leadership of MLA Lanka.
News English Title: Shiv Sena Party 5 corporators joined NCP party at Parner News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा