6 May 2024 6:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

चीनच्या कुरापती सुरूच | सीमेवर भारत आणि चिनी सैनिकांच्या धुमश्चक्रीत 20 चिनी सैनिक जखमी

Indian troops, thwarted, Chinese troops

लडाख, २४ जानेवारी: भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या कुरापती अजूनही सुरूच आहे. नियंत्रण रेषेवर चीनने सैनिकांचा फौजफाटा जमवलेला असतानाच तीन दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवांनानी चिनी सैनिकांचा हा प्रयत्न हाणून पडला. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत 20 चिनी सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे.

मागच्या आठवडयात चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैनिकांनी त्यांना आव्हान दिले. उत्तर सिक्कीमच्या नाकु ला येथे ही घटना घडली. भारताच्या जवानांनी पीएलएच्या सैनिकांना रोखल्यानंतर जोरदार हाणामारी झाली. सिक्कीमच्या नाकु ला येथे झालेल्या या घटनेमध्ये २० चिनी सैनिक जखमी झाले आहेत.

लडाखच्या मोल्डोमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये दोन महिन्यांनंतर अचानक ९ व्या फेरीतील बैठक झाली. या बैठकीतील निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. मात्र, एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठीच ही बैठक झाल्याचे समजते. भारतीय लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. आज तक, टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

News English Summary: China’s evils continue on the Indo-China Line of Control. Three days ago, Chinese troops tried to infiltrate Sikkim while China was gathering troops on the Line of Control. However, the Indian troops thwarted the attempt of the Chinese troops. Twenty Chinese soldiers were reportedly injured in the stampede.

News English Title: Indian troops thwarted the attempt of the Chinese troops news updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x