28 April 2024 8:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

हॉलिडेसाठी १२ हजार डॉलर आणि ४० लाख फिक्सिंगसाठी दिले | पार्थो दासगुप्तांचा कबुलनामा

TRP scam, Arnab Goswami, Partho Dasgupta

मुंबई, २४ जानेवारी: बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना लिखित स्वरूपात दिलेल्या काबुलनाम्यात अनेक धक्कादायक गोष्टी मान्य केल्या आहेत. त्यामध्ये विदेशात सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी १२ हजार डॉलर आणि TRP रेटिंग फिक्सिंगसाठी वेगळे ४० लाख रुपये दिल्याचं मान्य केलं आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असून त्यामध्ये हे लिखित दावे करण्यात आले आहेत. सलग तीन वर्ष पार्थो दासगुप्ता यांच्या सोबत आर्थिक व्यवहार सुरु होते असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. एकूण ३६०० पाणी चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट मध्ये संपूर्ण व्हाट्सअँप संवादाची माहिती देखील देण्यात आली आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये अनेक न्यूज चॅनल, रिपब्लिक टीव्ही, टाईम्स नाऊ आणि आजतक साठी बार्कचे वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे कथित टीरआरीप फेरफार आणि रेटींगच्या फिक्सिंग बाबत सांगण्यात आलेलं आहे.

याच विषयावरून ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “डॉन फरार आहे, अर्णब गोस्वामीने १२ हजार डॉलर आणि TRP रेटिंग फिक्सिंगसाठी वेगळे ४० लाख रुपये दिल्याचं पार्थो दासगुप्ता यांनी मान्य केलं आहे. ३६०० पाणी चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट, व्हाट्सअँप चॅट आणि ५९ आरोपींच्या स्टेटमेंट देण्यात आल्या आहेत.

 

News English Summary: Partho Dasgupta, the former CEO of BARC, has admitted many shocking things in his written letter to the Mumbai Police. It agreed to pay १२ 12,000 to enjoy a holiday abroad and a separate Rs 40 lakh for TRP rating fixing.

News English Title: TRP scam Arnab Goswami gave bribe of 40 lakhs to Partho Dasgupta to manage TRP news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x