28 April 2024 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल
x

1977 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या बाबतीत जे घडलं तेच मोदींच्या बाबतीतही घडणार? इतिहास पुन्हा घडणार

Highlights:

  • Loksabha Election 1977
  • १९७७ च्या लोकसभा निवडणुकीची चर्चा अचानक का सुरू आहे?
  • इंदिरा गांधींच्या ‘या’ निर्णयाने विरोधकांना आश्चर्याचा धक्का बसला होता
  • मोरारजी देसाई पंतप्रधान कसे झाले?
  • इंदिरांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती
  • त्या स्वतःची सीटही वाचवू शकल्या नव्हत्या
  • लोकांना रोखण्यासाठी ब्लॉकबस्टर फिल्म बॉबी दूरदर्शनवर
Loksabha Election 1977

Loksabha Election 1977 | २० मार्च १९७७ हा ऐतिहासिक दिवस होता. सहाव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांच्या पक्षाची सत्ता गेली होती आणि जनता दल पहिल्यांदाच निवडणुका जिंकून सरकार बनवलं होतं. या बदलामुळे देशभरातील जनता दलाचे समर्थक रस्त्यावर उतरून जल्लोष करत होते.

लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील हा तो क्षण होता, जेव्हा पंतप्रधानपदाचा चेहरा नसलेल्या विरोधी पक्षाने त्या वेळच्या सर्वात शक्तिशाली नेत्याला पराभूत केले होते. या निवडणुकीत इंदिरा गांधींसाठी हा पराभव अत्यंत निराशाजनक होता, कारण त्यावेळी त्यांना आपली जागा रायबरेलीही जिंकता आली नव्हती.

१९७७ च्या लोकसभा निवडणुकीची चर्चा अचानक का सुरू आहे?

मात्र १९७७ च्या लोकसभा निवडणुकीची चर्चा अचानक का सुरू आहे? भारताचे ज्येष्ठ राजकारणी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी यावर एक वक्तव्य केलं होतं. शरद पवार म्हणाले होते की, ही पहिलीच वेळ नाही, 1977 मध्ये हीच परिस्थिती होती. मग यावेळी आपण का जिंकू शकत नाही? चला तर मग जाणून घेऊया १९७७ मध्ये असे काय घडले की इतकी ताकद असूनही इंदिरा गांधी पराभूत झाल्या होत्या आणि तेच यावेळी मोदींच्या बाबतीत होणार असल्याचं म्हटलं जातंय?

शरद पवार नेमकं यासंदर्भात काय म्हणाले होते ते आधी जाणून घेऊया. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी २३ जून रोजी पाटणा येथे बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहून भाजपविरोधात एकत्रित लढा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पत्रकार परिषदेत सांगितले.

पवार पुढे म्हणाले की, ‘आतापर्यंत पंतप्रधानपदाचा चेहरा निवडू न शकणे ही विरोधकांचा कमकुवतपणा नाही, असे ते म्हणाले. कारण १९७७ मध्येही असेच घडले होते, त्यावेळी आम्ही जिंकलो होतो, मग आता का नाही? सध्या संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

इंदिरा गांधींच्या ‘या’ निर्णयाने विरोधकांना आश्चर्याचा धक्का बसला होता

१९७७ च्या लोकसभा निवडणुकांची मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार होती, पण इंदिरा गांधी यांनी १८ जानेवारीला निवडणुकीची घोषणा करून विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला. विरोधकांना तयारीची संधी मिळणार नाही आणि त्याचा फायदा त्यांना मिळेल, असे इंदिरांना वाटत होते. परंतु, तसे होऊ शकले नाही. त्यावेळी विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना चरणसिंग, अटलबिहारी वाजपेयी आणि चंद्रशेखर यांना वाटले की, इंदिरा गांधी मनोबल कमी करून विरोधकांना तोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाने ५४२ पैकी २९६ जागा जिंकल्या होत्या. तर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला १५४ जागा मिळाल्या. त्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १९८ जागा गमवाव्या लागल्या होत्या. इंदिरांसाठी हा मोठा ऐतिहासिक पराभव होता, ज्याची त्यांना अजिबात अपेक्षा आणि कल्पनाही नव्हती. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींच्या बाबतीत देखील तेच होईल असं म्हटलं जातंय. ही लोकसभा निवडणूक अनेक उन्मत्त नेत्यांचा राजकीय माज उतरवणारी ठरेल असं म्हटलं जातंय.

मोरारजी देसाई पंतप्रधान कसे झाले?

१९७७ च्या निवडणुका इंदिरा गांधींनी काही महिन्यांपूर्वी आधीच जाहीर केल्या होत्या, त्यामुळे विरोधकांना फारशी संधी मिळाली नाही. इंदिरा गांधी यांनाही तेच हवे होते, असे तत्कालीन राजकीय जाणकारांचे मत आहे. पण, जनतेने इंदिरा गांधींकडून जनता दलाकडे सत्तेची चावी सोपवली. 20 मार्च रोजी त्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि जनता दलाने निवडणूक जिंकली होती.

आता प्रश्न होता पंतप्रधानांच्या निवडीचा. विशेष म्हणजे चरणसिंग, अटलबिहारी वाजपेयी आणि चंद्रशेखर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना मागे टाकत ८१ वर्षीय मोरारजी देसाई यांची एकमताने पंतप्रधानपदी निवड झाली. मात्र, त्यांचे सरकार फार काळ टिकू शकले नाही आणि त्यानंतर तीन वर्षांनी १९८० मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या.

इंदिरांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती

या प्रकरणातील राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की, इंदिरा गांधी यांना आपल्या विजयाचा पूर्ण विश्वास होता. आपला विजय निश्चित करण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. इंदिरा गांधी यांनी संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान ४० हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. जम्मू-काश्मीर आणि सिक्कीम वगळता प्रत्येक राज्यात जाऊन त्यांनी २४४ प्रचार सभा घेतल्या होत्या.

त्या स्वतःची सीटही वाचवू शकल्या नव्हत्या

१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींना इतका दारुण पराभव पत्करावा लागला की त्यांना आपली परंपरागत जागा रायबरेलीही वाचवता आली नाही. या मतदारसंघात जनता दलाचे मोठे नेते आणि ‘जायंट किलर’ म्हणून ओळखले जाणारे राज नारायण यांनी त्यांचा पराभव केला होता. इंदिरा गांधींचा 55 हजार मतांनी पराभव झाला होता. राज नारायण यांच्याबद्दल असे म्हटले जात होते की, जर ते राजकारणी झाले नसते तर ते कुस्तीपटू झाले असते. कारण त्यांना कुस्तीची प्रचंड आवड होती.

लोकांना रोखण्यासाठी ब्लॉकबस्टर फिल्म बॉबी दूरदर्शनवर

इंदिरा गांधी यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जगजीवन राम आणि हेमवती नंदन बहुगुणा यांच्या राजीनाम्यानंतर विरोधक उत्साहात होते. दिल्लीतील रामलीला मैदानावर विरोधकांनी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. एवढी गर्दी झाली होती, जी विरोधकांनाही अपेक्षित नव्हती, असं म्हटलं जातं. ही रॅली थांबवण्यासाठी तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ला यांनी १९७३ चा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बॉबी’ इंदिरांच्या सांगण्यावरून दूरदर्शनवर चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही युक्तीही कामी आली नाही. विरोधकांच्या मेळाव्यापर्यंत पोहोचण्यासाठी लोक अनेक किलोमीटर चालत गेले.

Latest Marathi News : Loksabha Election 1977 history again check details on 11 June 2023.

हॅशटॅग्स

#Loksabha Election 1977(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x