28 April 2024 3:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

सीमावादावर हे शेवटचं हत्यार | आपण अंतिम पर्वाच्या दिशेने

NCP President Sharad Pawar, Maharashtra Karnataka Border

मुंबई, २७ जानेवारी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (२७ जानेवारी) ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचं आज प्रकाशन पार पडलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी सीमावादवर आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी सीमा भागातील संघर्ष आणि त्यांचा अनुभव सांगितला आहे. याशिवाय कर्नाटकात गेलेली मराठी भाषिक गाव महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी न्यायालयीन लढाई महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मागील अनेक वर्ष ज्या प्रश्नासाठी मराठी माणूस अस्वस्थ आहे, त्या प्रश्नाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पुस्तक रुपाने कायमस्वरुपी समाजासमोर कायमस्वरुपी राहावी यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला. डॉ. दीपक पवार यांच्यावर जबाबदारी टाकून हा एक ग्रंथ आज आपल्या सर्वांसमोर त्यांनी सादर केला. हा ग्रंथ या चळवळीचा इतिहास सर्वांसमोर आणण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मात्र, तरीही या पुस्तकात काही कमतरता आहेत, असं मला वाटतं”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीमाभागातील नागरिकांच्या लढ्याचे वर्णन करुन वर्षानुवर्षे शेतकरी, विद्यार्थी, तरुण, वृद्ध आदी सर्वच घटकांनी हा लढा चालू ठेवला असं सुरूवातील नमूद केलं. पवार म्हणाले, “सीमाभागात ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ची स्थापना करुन सत्याग्रहाची भूमिका घेतली. यासाठी अनेकांनी यातना भोगल्या. तथापि, सीमाभागातील नागरिक या सगळ्या यातना पिढ्यानपिढ्या सहन करत आहेत,” अशी हळहळ त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

News English Summary: NCP President Sharad Pawar described the struggle of the people in the border areas and said that farmers, students, young and old have been fighting for years. Pawar said, “We took the role of satyagraha by setting up ‘Maharashtra Unification Committee’ in the border areas. Many suffered for it. However, the people of the border areas have been suffering for generations, ”he said.

News English Title: NCP President Sharad Pawar talked on Maharashtra Karnataka Border issue news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x