2 May 2024 12:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर मोदींना साक्षात्कार | फोनवर रिचेबल असल्याची माहिती

Farmer Protest, PM Narendra Modi, Union Budget 2021

नवी दिल्ली, ३० जानेवारी: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे. सरकार शेतकऱ्यांपासून फक्त एक फोन कॉल दूर आहे. 11 फेब्रुवारीला नरेंद्र सिंग तोमर यांनी दिलेला प्रस्ताव अजूनही खुला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले,”मी नरेंद्र सिंह तौमर यांनी सांगितलेलाच मुद्दा पुन्हा एकदा सांगू इच्छितो. शेतकरी आणि सरकार यांच्यात अंतिम तोडगा भलेही निघाला नसेल, पण सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे की, शेतकऱ्यांपासून ते फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत,” असं मोदी म्हणाले.

सरकार शेतकऱ्यांसोबत सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. यामध्ये सर्व विषयांवर चर्चा होईल. सर्व पक्षांना बोलण्याची संधी मिळेल. कृषीमंत्री तोमर यांनी शेतकऱ्यांना प्रस्ताव दिला आहे. सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास नेहमीच तयार आहे, असं मोदी सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले. या बैठकीची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशींनी दिली. ‘आजच्या बैठकीला १८ पक्षांचे नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांचं आंदोलन आणि कृषी कायदे यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. लहान पक्षांनादेखील बोलण्याची अधिक संधी देण्याबद्दल एकमत झालं. मात्र मोठ्या पक्षांनी त्यात अडथळे आणू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे,’ अशी माहिती जोशींनी दिली.

 

News English Summary: I want to reiterate what Narendra Singh Tomar told farmers. He said – we’ve not reached to consensus but we’re giving you (farmers) the offer & you may go & deliberate. He told farmers that he was just a phone call away,” PM Modi told the all-party meeting, as per media sources.

News English Title: Farmer Protest PM Narendra Modi All Party Meet Farmers Protest Union Budget news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x