3 May 2024 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

सीएम साहेबांना सांगून बदली करायला लावेन, भाजप आमदार बंब

औरंगाबाद : गंगापूर पोलिसांनी पकडलेली गुटख्याची एक गाडी ही भाजपचे आमदार प्रकाश बंब यांच्या कार्यकर्त्याची होती असं चर्चा रंगली आणि त्यामुळेच प्रकाश बंब यांनी पकडलेली गाडी सोडून देण्यासाठी त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना दमबाजी केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आमदार प्रकाश बंब अडचणीत सापडले आहेत.

ती गुटख्याची गाडी सोडून देण्यासाठी आमदार प्रकाश बंब यांनी पोलिसांना फोन केला. परंतु स्थानिक पोलिसांनी न जुमानल्याने प्रकाश बंब यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना थेट दमबाजी केली. पोलिसांना दमबाजी करताना ते म्हणाले की, ‘मला कळतं कुठे काय चालतं ते. आणि लोकप्रतिनिधींनी पोलिसांना सांगू नये व पोलिसांनी लोकप्रतिनिधींना शिकवू नये. आजपासून या विभागात कुठेही अवैध धंदे चालणार नाही. मुख्यमंत्री साहेबांकडून मुंबईतून बदलीच करायला लावेन’, अशी धमकी देताना बंब व्हिडिओत स्पष्ट दिसत आहेत. आमदाराचा फोन आल्यावर कुठलीही गाडी सोडलीच पाहिजे आणि जर माझे म्हणणे ऐकत नसाल तर तुमची बदली करुन टाकेन, अशी धमकीच त्यांनी पोलिसांना दिला.

परंतु प्रकाश बंब यांना अनेक माध्यमांनी याबाबत विचारले असता त्यांनी उलटीच कहाणी सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले की, तो अधिकारी पहिल्या गाड्या पकडतो. नंतर पैसे घेऊन सोडून देतो, असं मला सांगण्यात आलं. त्या पोलीस निरीक्षकावर केवळ रागावलो होतो. पण त्यांना कोणतीही दमबाजी केली नाही, असे भाजप आमदार बंब यांनी सांगितले.

एकूणच तो व्हिडिओ पाहता सत्तेची नाश ही लोकप्रधिनींच्या डोक्यात गेली असून त्यातून अनेक सरकारी अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होताना दिसत आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x