3 May 2024 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

कार्यकर्ता-पदाधिकारी फुटला तरी बातमी | याचा अर्थ त्या पक्षाच्या असण्याची सगळेच दखल घेतात

Marathi actor Sanjay Mone, Raj Thackeay, MNS KDMC party

डोंबिवली, ०२ फेब्रुवारी: कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला काल मोठा धक्का दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

त्यानंतर मंदार हळबे यांनी भाजपाची वाट धरली आहे. हे आतापर्यंत २ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, तर मागील विधानसभा निवडणुकीत मनसेकडून डोंबिवली मतदारसंघाची तिकीट हळबेंना देण्यात आली होती, तेव्हा ३७ हजारांनी मंदार हळबे यांचा पराभव झाला होता. मंदार हळबे हे कल्याण-डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षनेतेही होते. यावर अभिनेते संजय मोने यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे आणि ती पोस्ट सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

काय आहे फेसबुक पोस्ट?

‘ज्या पक्षाचा फक्त एक आमदार आहे, त्या पक्षाच्या कुठल्याही पातळीवरच्या नेत्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश केला की लगेच “मोठी बातमी”असा मथळा देऊन बातमी लिहिली किंवा बोलली जाते..याचा अर्थ त्या पक्षाच्या “असण्याची” सगळे जण दखल घेतात..हो ना?याचा अर्थ सर्वसामान्य मतदारांनी लक्षात घ्यायला हवा.. या मधल्या “lock down”च्या काळात सत्ता हाताशी नसतांना ज्यांनी तुम्हाला मदत (साहाय्य खरं तर)केली, ते जरा लक्षात ठेवा.. माझ्या मतदार संघात ,जो स्वतः राज ठाकरे यांचाही आहे, श्री.नितीन सरदेसाई यांनी जे काही कष्ट केले, त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्याची पावती देणं हे आपलं कर्तव्य आहे.. कर्तव्य म्हटलं की उगाच जबाबदारी येते.. तर थोडा शब्दप्रयोग बदलतो, तर..आपला हक्क आहे असं समजा…’ असे म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, ‘तळटीप-मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाहीये. फक्त परिस्थिती आणि अवस्था काय होती ते सांगतोय.. इतर अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आणि अवस्था होती.. शेवटी आपण ठरवायचं आहे.. जाणता राजा (जो जाणतो) आणि नेणता राजा (जो आपल्याला हव्या त्या ठिकाणी -इप्सित स्थळी सुरक्षित नेतो ) यात निवड करायची आहे.. बोटाला रंग लागला की मतदान असं समजू नका.. रंग लावायला बोट शिल्लक राहिलंय हे महत्वाचं.’

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सोबत विद्यार्थी सेनेपासून कार्यरत राहिलेले राजेश कदम हे शिवसेनेत गेल्याने, हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजेश कदम यांच्यासोबत अनेक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण या मतदारसंघातील हे सर्व पदाधिकारी असल्याचे समजत आहे.

 

News English Summary: Mandar Halbe is waiting for BJP. He has been elected as a corporator twice so far. In the last assembly elections, MNS had given the ticket of Dombivali constituency to Halbe, but Mandar Halbe was defeated by 37,000. Mandar Halbe was also the Leader of Opposition in Kalyan-Dombivali Municipal Corporation. Actor Sanjay Mone has posted on social media and this post is currently the topic of discussion.

News English Title: Marathi actor Sanjay Mone post on MNS KDMC party news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x