29 March 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

फडणवीस-मोदी काश्मीरवर भाषण ठोकत आहेत आणि बाजूच्या गावात शेतकऱ्याची आत्महत्या

BJP, Narendra Modi, Devendra Fadnavis, Farmers Suicide

खामगाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा वरवट बकाल व खामगाव येथे आयोजित केली आहे. या सभेपूर्वी शेगाव तालुक्यातील खातखेड येथील राजू नामदेव तलवारे या युवकाने पुन्हा आणूया आपले सरकार हे टी-शर्ट घालून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली. जळगाव जामोद तालुक्यातील वरवट बकाल येथे काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत आहे. यापूर्वीच खातखेड येथील या युवकाने आत्महत्या केली.

जळगाव जामोद इथून कामगार मंत्री डॉ संजय कुटे आमदार आहेत. शेगाव तालुक्यातील खातखेड इथं रविवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू ज्ञानदेव तलवारे असं 35 वर्षीय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी यवेल्यातही एका तरुण शेतकऱ्याने कर्जबारीपणामुळे आत्महत्या केली. त्यामुळे भर निवडणुकांमध्येही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने शेतकऱ्यांसाठी झालेल्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

दरम्यान, जळगाव येथील सभेत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं. हिंमत असेल तर विरोधकांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोदी सरकारने हटवलेलं कलम ३७० पुन्हा लागू करून दाखवण्याचं आश्वासन द्यावं. विरोधकांनी नकराश्रू ढाळणं बंद करावं. लोकांना ते मूर्ख बनवत आहेत. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी कलम ३७० पुन्हा लागू करावं आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर ते वाचतील का? त्यांचं राजकीय अस्तित्व राहील काय? असं मोदी म्हणाले. तुमच्यात हिंमत असेल तर तिहेरी तलाक पुन्हा लागू करून दाखवा, असं आव्हानही त्यांनी दिलं.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x