14 July 2020 7:31 PM
अँप डाउनलोड

आम्ही काही नटरंग नाही, त्यामुळे आम्ही हातवारे करत नाही: फडणवीसांचं पवारांना उत्तर

Sharad Pawar, CM Devendra Fadnavis, Wrestler Remark

जळगाव: लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही असं उत्तर देत आणि आक्षेपार्ह हातवारे करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बार्शी या ठिकाणी झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्री म्हणाले,”आम्ही नटरंगसारखं काम केलं नाही, आम्हाला हातवारे करता येत नाही. उत्तर आम्हालाही देता येईल, पण आम्ही देणार नाही,” असं सांगत फडणवीस यांनी पवारांना टोला लगावला.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

मागील आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना या निवडणुकीत काहीही मजा येत नाही कारण आमचे पैलवान तयार आहेत, आखाड्यातही उतरवलं आहे. मात्र समोर कोणीही नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला पवारांनी उत्तर दिलं होतं. “लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही असं उत्तर देत आणि आक्षेपार्ह हातवारे करत पवारांनी उत्तर दिलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा आज जळगावात झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. सभेदरम्यान मतदारांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ”खरा पैलवान कोण? हे जनता २४ ऑक्टोबरला दाखवून देईल. तसेच आम्ही काही नटरंग नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करत नाही. तसेच ते आम्हाला शोभतही नाही. सध्याच्या परिस्थितीमुळे शरद पवार यांची मानसिकता ढासळी आहे. त्यामुळे ते हातवारे करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

तर शरद पवारांच्या पक्षाची अवस्थाही फारशी चांगली नाही. ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बचे हुए मेरे पिछे आओ’, अशी त्यांची गत झाली आहे. इतकी वर्षे राजकारणात घालवल्यानंतर अशी वेळ आल्याने शरद पवार यांचा तोल जाताना दिसत आहे. त्यामुळे सोलापूरमधील सभेत त्यांचा तोल गेला आणि त्यांनी आक्षेपार्ह हातवारे केले. मात्र, आम्ही कधीही नटरंगसारखी कामे केली नाहीत. त्यामुळे आम्हाला तसे हातवारे करायला जमणार नाही. आता खरा पैलवान कोण, याचा फैसला २४ तारखेला जनताच करेल, असे फडणवीसांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी शेवटचा रविवार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या आज राज्यभरात सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी हेदेखील आज प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x