1 May 2024 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

ऑनलाईन आणीबाणीवरून सोशल मीडियावर रणकंदन | सरकारकडून ट्विटरला पुन्हा नोटीस

Ministry of Information Technology, Legal notice, Twitter

नवी दिल्ल्ली, ०३ फेब्रुवारी: सिंधू बॉर्डरवरील वास्तव सामान्य लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने इंटरनेटवर बंदी घालण्याचं कायम ठेवलं आहे. समाज माध्यमांच्या मदतीने लोकांपर्यंत वास्तव पोहोचू नये यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरु असल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे.

दुसऱ्या बाजूला एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. तो म्हणजे ट्विटरवर शेतकऱ्यांची बाजू मांडताना आणि वास्तव दाखवणाऱ्या न्युज तसेच व्यक्तिगत अकाऊंटवर अचानक बंदी घालण्याचा सपाटा ट्विटर इंडियाने सुरु केला होता. त्यामुळे ट्विटरवर मोदी सरकारवर सडकून टीका सुरु झाली होती.

त्यानंतरही माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही नोटीस पाठवण्यात आली होती. मंत्रालयाच्या तक्रारीवरून निलंबित करण्यात आलेले सुमारे २५० अकाऊंट सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आले. यामुळे आता सरकारकडून ट्विटरला पाच पानी नोटीस पाठवण्यात आली आहे.

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि मजकूर हा चुकीच्या तथ्यांवर आधारित आहे. याचा उद्देश केवळ द्वेष पसरवण्याचा होता. समाजात तणाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा मजकूर शेअर व्हावा, यासाठी प्रवृत्त करणारे कॅम्पेन चालवण्यात आले. हिंसेला प्रोत्साहन मिळेल, अशा आशयाचा मजकूर अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी असा मजकूर शेअर होणे धोकादायक आहे, असेही या नोटिसीत म्हटले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर #ModiPlanningFarmerGenocide हा हॅशटॅग वापरून नकारात्मक मजबूर ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ट्विटरकडून हा हॅशटॅग वापरून मजकूर शेअर करण्याऱ्या अनेकांचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले होते. मात्र, सोमवारी ट्विटरने हे अकाऊंट पुन्हा पूर्ववत केले.

 

News English Summary: Even after that, the notice was sent by the Ministry of Information Technology. About 250 accounts, which were suspended following a complaint by the ministry, were reopened on Monday. The government has now sent a five-page notice to Twitter. Posts and text shared on Twitter are based on inaccurate facts. It was only meant to spread hatred. A campaign was launched to create tension in the society by sharing such texts. Violence will be encouraged, not freedom of expression. It is dangerous to share such texts to maintain law and order, the notice said.

News English Title: Ministry of Information Technology sent legal notice to Twitter news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x