12 May 2025 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | बँकिंग पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: YESBANK Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जबरदस्त खरेदी, वेळीच एंट्री घ्या - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टॉक खरेदीला झुंबड, अशी कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | अत्यंत स्वस्त शेअर्सवर तुटून पडले गुंतवणूकदार, आज 5.53% वाढला, अपडेट आली - NSE: NHPC Tata Motors Share Price | धमाल होणार गुंतवणूकदारांची, टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार, आज शेअर 8.93 टक्क्यांनी वाढली, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

फासे पलटण्यासाठी फडणवीसांना माझ्या मनापासून शुभेच्छा | राऊतांच्या टोला

Shivsena MP Sanjay Raut, Devendra Fadnavis, Nana Patole, Legislative Assembly speaker

मुंबई, ०६ फेब्रुवारी: काँग्रेसनं महाराष्ट्रात खांदेपालट करत प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं नाना पटोले यांच्या हाती दिली आहेत. त्याचबरोबर सहा कार्य अध्यक्षही नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्यानं विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त झालं आहे. पुन्हा निवडणूक होणार असून, यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे.

मात्र त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या लवकरच फासे पलटतील या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. फडणवीसांच्या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका वाक्यात भाष्य केलं आहे. यावर प्रसार माध्यमांकडून संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी “देवेंद्र फडणवीसांना यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा”, असं एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, नाना पटोले हे सक्षम आणि आक्रमक नेते आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसला ऊर्जा देण्याचं काम नानांनी करावं. प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. आम्हीही आमचा पक्ष वाढवू. पण, काँग्रेस देशात मजबूत व्हावी,” असं खासदार संजय राऊत म्हणाले.

 

News English Summary: The Congress has shrugged its shoulders in Maharashtra and handed over the reins of the state presidency to Nana Patole. In addition, six working presidents have been appointed. However, with the appointment of Nana Patole as the State President, the post of Speaker of the Legislative Assembly has become vacant. There is talk that the Chief Minister and the Deputy Chief Minister are upset over the re-election. He has been confirmed by Shiv Sena leader MP Sanjay Raut.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut reply to Devendra Fadnavis over Nana Patole resigned as Legislative Assembly speaker news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या