कोण कुठली रिहाना | तिच्यामुळे भारतरत्नांना सरकारनं ट्विट करायला लावणं योग्य नाही

मुंबई, ०६ फेब्रुवारी: राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच केंद्र सरकारसोबत अनेक बैठक देखील पार पडल्या आहेत, ज्यामार्गे कोणताही तोडगा निघालेला नाही.
संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज ‘चक्का जाम’ करण्यात आला. आज दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन केलं गेलं. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं होते की, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये चक्का जाम होणार नाही, मात्र या दोन्ही राज्यांमध्ये एक लाख शेतकरी स्टॅंडबायमध्ये असतील. राकेश टिकैत म्हणाले होते की, “चक्का जाम वापस घेतलेला नाही. मात्र या कार्यक्रमात थोडा बदल केला आहे.
दरम्यान, याच शेतकरी आंदोलनावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्याचं मत व्यक्त केलं आहे. टिकरी, सिंघू आणि गाझीपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाकेबंदी केंद्र सरकारनं केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला सुनावलं आहे. मोदी सरकारने आणलेलय नव्या कृषी कायद्यांपेक्षा या कायद्यातील तरतुदी चुकीच्या असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे. तसेच या कायद्याचा फायदा काही मोजक्या लोकांना होऊ नये असं देखील म्हटलं आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी ज्या पॉप सिंगरच्या ट्विटमुळे हा वाद सुरू झाला त्या रिहानावरही जोरदार टीका केली. केंद्र सरकारने देशातील प्रतिष्ठीत व्यक्तींना अशाप्रकारचं ट्विट करायला लावू नये, असं राज ठाकरे म्हणाले. “कोण कुठली रिहाना? कोण बाई आहे ती? तिला का इतकं महत्वं दिलं जातंय? तिनं ट्विट करायच्याआधी तिला कुणी ओळखत तरी होतं का? आणि अशा व्यक्तीनं ट्विट केल्यानंतर आपल्या देशातील भारतरत्नांना सरकारनं ट्विट करायला लावणं हे बरोबर नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.
News English Summary: Raj Thackeray also slammed Rihanna, the pop singer’s tweet that sparked the controversy. The central government should not force eminent persons in the country to tweet like this, said Raj Thackeray. “Who is Rihanna? Who is the woman? Why is she given so much importance? Did anyone know her before she tweeted? And after such a person tweets, it is not right for the government to force Bharat Ratnas in our country to tweet,” said Raj Thackeray.
News English Title: MNS Chief Raj Thackery expressed his opinion over tweet of Rihanna on farmers protest news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL