3 May 2025 12:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

ट्रॅक्टर रॅली काढून काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन | काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष करणार

Congress demonstrates, Mumbai Congress, tractor rally, Nana Patole

मुंबई, १२ फेब्रुवारी: काँग्रेस नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून औपचारिकरित्या पदभार स्वीकारला आहे, मुंबईतील टिळक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला, त्यानंतर मुंबईत काँग्रेसनं शक्तीप्रदर्शन करून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

मी परवा नागपुरात होतो. नागपुरातही परिवर्तनाची लाट दिसली. महाराष्ट्रात आज जी लाट दिसत आहे ती केंद्रातील हुकूमशाही सरकारविरोधातील परिवर्तनाची लाट आहे. मुंबईत महात्मा गांधींनी परकीयांना बाहेर काढण्याचा जो विचार मांडला तोच विचार आम्ही मांडत आहोत. देशातील हुकूमशाही मोदी सरकारविरोधात ‘चले जाव’ ची घोषणा आम्ही देणार आहोत,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. पुढं काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदींनी देशाच्या शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. राज्यसभेच्या माध्यमातून आंदोलनावर टीका केली, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केलं. या माध्यमातून आम्ही देशाच्या अन्नदात्याचा अपमान करेल त्याच्याविरोधात या पद्दतीची व्यवस्था निर्माण केली जाईल असा संदेश देत आहोत,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Newly appointed Congress state president Nana Patole has formally taken over from the late state president Balasaheb Thorat in the presence of Maharashtra in-charge HK Patil. The event was held at Tilak Bhavan in Mumbai. Thousands of Congress workers were present on the occasion.

News English Title: Congress demonstrates Mumbai tractor rally Nana Patole accepted post state president news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या