28 April 2024 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

पेट्रोलची सेंचुरी | 'अब की बार' लोकांचं जगणं अवघड झालं यार

Premium petrol, Crossed Hundred

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी: देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनला भिडत असल्याने लोकांचा खिसा खाली होत आहे. त्यामुळे आता मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरातही लोक वाहनांनी प्रवास करताना दहावेळा विचार करत आहेत. पेट्रोलचा दर परवडत नसल्याने गाड्या बाहेर काढायच्या की नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्याने आता बरेच ग्राहक पेट्रोलची खरेदी टाळत असल्याचे पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

तेल उत्पादक कंपन्यांनी वाढवलेल्या किमतीमुळे देशात सलग ७व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली. नवीन किमतीनुसार आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८९ रूपये होता, म्हणजे कालपेक्षा त्यात २६ पैश्यांची वाढ झाली. मुंबईमध्ये साध्या पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९५ रूपयांपेक्षा जास्त होती. तर परभणी येथे प्रीमियम (पदार्थमिश्रित) पेट्रोलच्या किमतीने शंभरी ओलांडली.

सोमवारी झालेल्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ८८.९९ रूपये आणि ७९.३५ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. तर मुंबईत पेट्रोलचे दर ९५.४६ रूपये, डिझेलचे दर ८६.३४ रूपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर ९१.१९ रूपये आणि डिझेलचे दर ८४.४४ रूपये, कोलकात्यात ९०.२५ रूपये आणि डिझेलचे दर ८२.९४ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात जवळपास १८ रूपयांची वाढ झाली आहे.

 

News English Summary: Petrol and diesel prices rose for the seventh day in a row in the country on account of increased prices by oil companies. According to the new price, the price of petrol in Delhi today was Rs 89 per liter, an increase of 26 paise over yesterday. In Mumbai, the price of ordinary petrol was more than Rs 95 per liter. In Parbhani, the price of premium petrol has crossed Rs 100.

News English Title: The price of premium petrol has crossed rupees hundred 100 news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x