4 May 2025 1:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

चुकूनही स्कॅन करू नका QR Code | अन्यथा तुमचं अकाऊंट रिकामं होईल

Quick Response, QR code, Security alert

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी: अलीकडे ऑनलाईन व्यवहार करण्याकडे सर्वांचाच अधिक कल असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. QR कोडच्या मदतीने युजर्सना जाळ्यात अडकवले जात आहे. Quick Response (QR) हे सर्वात आधी जपानमध्ये बनवण्यात आले होते.

आता भारतात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. क्यूआर कोड फिशिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि यापासून कशी फसवणूक केली जाऊ शकते याबाबत जाणून घेऊया. आपण दुकान किंवा काउंटरवर क्यूआर कोडद्वारे स्कॅन करुन पैसे भरल्यास कमी धोका असतो, मात्र स्कॅमर्सना येथे फसवणूक करण्याचे काही नवीन मार्ग देखील सापडले आहेत.

५००० रुपये जिंकल्याबद्दल अभिनंदन’ यासारखे मजकूर संदेश अज्ञात व्यक्ती नागरीकांना पाठवतो. या संदेशामध्ये आपल्याला सांगितले जाते की, कोड स्कॅन केल्यानंतर, यूपीआय पिन प्रविष्ट केल्यानंतर रक्कम प्रविष्ट केल्यास ती रक्कम आपल्या खात्यात जमा होईल. यासह क्यूआर कोडचा फोटोही पाठविला जातो.

बनावट कोड स्कॅन केल्यावर, वापरकर्त्यास एका मूळ पृष्ठाकडे निर्देशित केले जाते जे खरे असल्यासारखे दिसते. तेथे पीडिताला वैयक्तिक ओळखण्यायोग्य माहिती नोंदवून लॉगिन करण्यास सांगितले जाते. नागरिक यावर विश्वास ठेवतात आणि फसवणूक करून घेतात. यामुळे क्यूआर कोड स्कॅन करताना काळजी घ्या. याचबरोबर तुम्ही जर पैसे भरण्यासाठी क्यूआर कोड वापरत असल्यास तर दर्शविलेल्या माहितीकडे लक्ष द्या. क्यूआर कोडला एका लिंकप्रमाणे पहा. हा कोड कोठून आला असेल याबाबत काही शंका असेल तर स्कॅनिंग टाळा.

 

News English Summary: After scanning the fake code, the user is directed to an original page that appears to be true. There the victim is asked to login by entering personally identifiable information. Citizens believe this and cheat. So be careful when scanning the QR code. Also, if you are using a QR code to pay, pay attention to the information provided. View the QR code as a link. Avoid scanning if you have any doubts about where this code came from.

News English Title: Quick Response means QR code alert news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या