20 September 2021 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली | चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं - हसन मुश्रीफ भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल | 50 लाखांचे बेनामी उत्पन्न सोमय्या आता रश्मी ठाकरेंना लक्ष करताना त्यांच्या मालमत्तेवरून अलिबाग 'आरोप पर्यटन दौरा' करणार सोमैयांची आरोप पर्यटन यात्रा | मागील ३ दिवसांत ४ दौरे | सत्तेत असताना मुलुंडमध्येच असायचे व्यस्त
x

आता ट्रॅफिक पोलिसांना गाडीची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही

नवी दिल्ली : केंद्रीय परिवाहन मंत्रालयाच्या अध्यादेशानुसार डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर तुमच्या वाहनांची मूळ कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमची ट्रॅफिक पोलिसांच्या नियमातून सुटका होण्याची शक्यता आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

या अध्यादेशानुसार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल केल्याने आता यापुढे तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांना तुमचे मूळ लायसन्स तसेच गाडीची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी मागता येणार नाहीत. कारण डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत.

याआधी वाहन चालकांना किंवा वाहन धारकाला प्रवासादरम्यान वाहनाची कागदपत्रे, लायसन्स, पीयुसी, इंन्शुरन्स सोबत ठेवणे अनिवार्य होत आणि त्या नेहमी सोबत हाताळणे शक्य होत नव्हते. त्यात ट्रॅफिक पोलिसांनी अडविल्यास नाहक भुर्दंड भरावा लागत होता. परंतु या सर्व त्रासातून मुक्तता होणार आहे. वाहनाच्या नंबरवरून पोलीस त्यांच्या मोबाईलवरील अॅपवर सर्व माहिती पाहू शकणार आहेत. तसेच वाहनचालकही आपल्या अॅपवरून ही कागदपत्रे त्यांना दाखवू शकणार आहेत. याचा फायदा पोलीस आणि वाहन चालक या दोघांनाही होणार आहे.

यासाठी खास करून माहिती तंत्रज्ञान कायदा २०० आणि मोटार वाहन कायदा १९८८ मध्ये हे फेरबदल करण्यात आले आहेत. डिजिटल डॉक्युमेंट वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वीकारली जात नसल्याच्या अनेक तक्रारी परिवाहन मंत्रालयाकडे माहिती अधिकारामार्फत करण्यात आल्या होत्या असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x