4 May 2024 4:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सुशांतसिंग प्रकरणात भाजपच्या मोठ्या नेत्याचं नाव आल्याने केंद्राने CBI अहवाल दाबून ठेवला

Congress, Nana Patole, BJP, Sushant Singh Rajput

मुंबई, १८ फेब्रुवारी: आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा काळ खूप चालला. मात्र, आता सर्वसामान्यांना न्याय मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला आहे,” असा टोला काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला. ते नागपुरात एका सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली आहे.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या धोरणांवर सडकून टीका केली. भारतीय जनता पक्षाने सुशांतसिंग प्रकरणात राज्य सरकारला तीन महिने बदनाम केलं. यात भारतीय जनता पक्षाचा एक मोठा नेता अडकला आहे,” असा आरोप नाना पटोले यांनी केला. तसेच, भारतीय जनता पक्षाचा नेता अडकल्यामुळेच सीबीआयने अहवाल दाबून ठेवला आहे, असा दावा देखील त्यांनी केला.

“या देशाला काँग्रेसच्या विचाराने स्वातंत्र्य मिळाले. आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा कार्यकाळ खूप चालला. मात्र, यानंतर सर्वसामान्यांना न्याय मिळेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार्ज काढण्यासाठीच मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला आहे,” असे नाना पटोले म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीकेचे आसूड ओढले. “नितीन गडकरी साहेबांनी एक बंदर स्वस्तात विकलं. सध्या देशात फास्टटॅग सुरु करण्यात आलं आहे. या प्रक्रियेतही मोठा भ्रष्टाचार आहे,” असा आरोप नाना पटोले यांनी केला. तसेच, आगामी दोन तीन दिवसांत यावर बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

News English Summary: He criticized the various policies of the Bharatiya Janata Party. The Bharatiya Janata Party defamed the state government for three months in the Sushant Singh case. A big leader of Bharatiya Janata Party is involved in this, ”Patole alleged. He also claimed that the CBI had suppressed the report because the BJP leader was trapped.

News English Title: Congress state president Nana Patole criticised BJP over Sushant Singh Rajput CBI enquiry news updates.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x