28 April 2024 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा
x

Special Recipe | रवा नारळ बर्फी

Special recipe, Rava coconut burfi, Indian Recipes

मुंबई, १९ फेब्रुवारी: गोकुळाष्टमी आणि दहीकालानिमित्तानं घरात वेगळा गोडाचा पदार्थ तयार करण्याचा तुमचा बेत असेन तर नक्की ट्राय करा रवा नारळ बर्फी. अत्यंत सोप्या पद्धतीनं या बर्फीची पाककृती वाचकांसाठी आणली आहे. ही पाककृती करायलाही सोपी आहे आणि वेळही कमी घेते.

साहित्य :
३ मोठे चमचे तूप, पाऊण कप रवा, अर्धा कप खवलेला नारळ, २ कप दूध, पाऊण कप साखर, १ लहान चमचा वेलची पावडर, पिस्ताचे काप
पाककृती : एक पॅनमध्ये तूप गरम करावं त्यात मंद आचेवर रवा भाजून घ्यावा. रवा भाजल्यानंतर त्यात नारळाचा किस घालावा. हे मिश्रण ३ ते ५ मिनिटे आचेवर परतून घ्यावं.

  • दुसऱ्या पॅनमध्ये दूध उकळून घ्यावं. दूध उकळल्यानंतर रवा- नारळाचं मिश्रण त्याच घालावं. हे मिश्रण एकजीव करून घ्यावं.
  • या मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतर यात साखर आणि वेलची पावडर टाकून मिश्रण पुन्हा एकजीव करावं.
  • एका ट्रे ला थोडं तूप लावावं, यात हे मिश्रण व्यवस्थित पसरून ठेवावं. हा ट्रे फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावा. त्यानंतर या मिश्रणाचे चौकनी काप करावे. पिस्त्यांची कापं गार्निश म्हणून वापरावीत.

 

News English Summary: If you plan to make a different sweet treat at home on the occasion of Gokulashtami and Dahikala, then definitely try semolina coconut barfi. This ice cream recipe is brought to the readers in a very simple way. This recipe is also easy to make and takes less time.

News English Title: Special recipe of Rava coconut burfi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x