मुंबई, २३ फेब्रुवारी: नारळ पाणी हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतं. त्यातून उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अनेक पोषक तत्वाचा खजिना नारळ पाण्यात असतो म्हणूनच नारळ पाणी प्यावं. खूप तहान लागणे, जीव कासावीस होणे, चक्कर येणे, प्रेशर ‘लो’ होणे यासाठीही नारळ पाणी उपयोगी आहे. मात्र हे कोणी प्यावं आणि कधी प्यावं हे पाहणंही गरजेचं आहे.

ज्यांना कफ, सर्दीचा त्रास वारंवार होतो त्यांनी नारळ पाणी पिणे टाळावं. नारळाचे पाणी हे गोड आणि थंड आहे. हे पाणी थंड असल्याने ते कफ वाढवणारं आहे. त्यामुळे कफचा त्रास होणाऱ्यांनी तो कमी खावा.

मधुमेह असणाऱ्यांनी नारळाचं पाणी अतिप्रमाणात पिऊ नये कारण पाणी हे गोड असतं, त्यात नैसर्गिक शर्करा असते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या आणि नारळ पाण्याचं सेवन करा.

कधी प्यावं?
शक्यतो रिकाम्या पोटी नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे शरीराला उर्जा मिळते. याव्यतिरिक्त तुम्ही कधीही नारळ पाण्याचं सेवन करू शकता. मात्र शहाळं विकत घेताना एक गोष्ट लक्षात घ्या हे शहाळं ताज असावं. एक ते दोन आठवडा जुनं शहाळं खरेदी करू नये. शहाळं फोडल्यानंतर लगेच पाणी प्यावं ते फ्रिजमध्ये ठेवून किंवा दुसऱ्या दिवशी पिऊ नये. यामुळे नारळातले पोषक घटक कमी होतात.

 

News English Summary: Coconut water is more beneficial for health. It is advisable to drink coconut water in summer. Coconut water is a treasure trove of many nutrients, so drink coconut water. Coconut water is also useful for extreme thirst, nausea, dizziness and low blood pressure. But it is also important to see who drinks it and when.

News English Title: Important to see when to drinks coconut water health article news updates.

Health First | नारळ पाणी कधी प्यावं | समजून घेणं गरजेचं