8 March 2021 7:56 PM
अँप डाउनलोड

Bhoot Police Movie | 'भूत पोलिस' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Bhoot police movie, first poster, Release date

मुंबई, २३ फेब्रुवारी: मागील कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला सैफ अली खान, अर्जुन कपूर स्टारर ‘भूत पोलिस’ चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि अर्जूनसह जैकलिन फर्नांडिस, यामी गौतम प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबर 2020 मध्ये या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट रखडल्याने याचे शूटिंग उशिराने सुरु झाले. आज या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले असून यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भूत पोलिस हा चित्रपट 10 सप्टेंबर 2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पवन किर्पलानी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. रमेश तोरानी आणि अक्षय पूरी या चित्रपटाचे निर्माते आहेत.

भूत पोलिसचे पोस्टर पाहिलात तर यात तुम्हाला एका डोंगरावर चार जण उभे आहेत असे दिसतील. अंधा-या रात्रीत एका मुलीच्या हातात चाबूक, दुसरीच्या हातात मशाल दिसत आहे. यातील एक जैकलीन आणि दुसरी यामी गौतम आहे. तर या दोघींच्या मध्ये अर्जुन कपूर आणि सैफ अली खान उभे आहेत. हा पाठमोरा फोटो असल्यामुळे या चौघांचा लूक या पोस्टरमध्ये दिसत नाहीय.

प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे पोस्टर बनविण्यात आले आहे. यात पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर अर्जुन कपूर आणि सैफ अली खान ही जोडी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची या दोघांनी ऑनस्क्रिन पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

 

News English Summary: The first poster of Saif Ali Khan, Arjun Kapoor starrer ‘Bhoot Police’, which has been in the news for the last several days, has come out. The film will star Jacqueline Fernandes, Yami Gautam along with Saif Ali Khan and Arjun. It is said to be a horror comedy film. The movie was announced in September 2020. The film was delayed due to a lockdown. The first poster of the film has come out today and it also has the release date of the film.

News English Title: Bhoot police movie first poster released and release date announced news updates.

हॅशटॅग्स

#BollywoodMovie(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x